खुशखबर: स्वातंत्र्यदिनी Creo Mark 1 वर तब्बल 70% सूट
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
06 Aug 2016 05:05 PM (IST)
NEXT
PREV
नवी दिल्ली: स्मार्टफोन मेकर स्टार्टअप कंपनी क्रियोने स्वातंत्र्यदिनी ग्राहकांना Mark 1 या स्मार्टफोनवर तब्बल 70% देण्याचा निर्णय घेतला आहे. 70 व्या स्वातंत्र्यदिनाचा उत्साह वाढवण्यासाठी कंपनीने ग्राहकांना 13,999 रुपयांमध्ये हा स्मार्टफोन उपलब्ध करून देत आहे. कंपनीने वेबसाईटवरून दिलेल्या माहितीनुसार, 8 ते 15 ऑगस्टदरम्यान ही ऑफर ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहे. या स्मार्टफोनची मूळ किंमत 19,999रुपये आहे.
या स्मार्टफोनमध्ये 5.5 इंचाचा QHD डिस्प्ले आणि प्रोटेक्शनसाठी गोरिला ग्लास देण्यात आली आहे. तसेच यामध्ये 1.9GHz ऑक्टाकोर मीडिया टेक हेलियो X 10 प्रोसेसर आहे. 3 GB रॅमसोबत या स्मार्टफोनमध्ये 32 GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. ती 128 GB पर्यंत वाढवता येऊ शकते.
फोटोग्राफी आणि व्हिडीओग्राफीसाठी यामध्ये पीडीएएफ आणि एलइडी फ्लॅशसोबत 21 मेगापिक्सल रिअर तर 8 मेगापिक्सलाचा फ्रंट कॅमेरा देण्यात आलेला आहे. या स्मार्टफोनमध्ये 4 K रिझॉल्यूशन आणि स्लोमोशनमध्येही व्हिडीओ रेकॉर्डिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या स्मार्टफोनचे फ्यूल ओएस सॉफ्टवेअर हे वैशिष्ट्य असून कंपनी प्रत्येक महिन्याला हे अपडेट करून देणार आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -