मुंबई : लेनोव्होने भारतीय बाजारपेठेत 'लेनोव्हो Z2 प्लस' या स्मार्टफोनच्या किंमतीत मोठी कपात केली आहे. दोन्ही व्हेरिएंटच्या किंमती सुमारे अडीच ते तीन हजार रुपयांनी स्वस्त करुनग्राहकांसाठी उपलब्ध करुन दिले आहेत.

  • 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेजच्या व्हेरिएंटची मूळ किंमत 17 हजार 999 रुपये होती. आता या व्हेरिएंटची किंमत 3 हजार रुपयांनी कमी करुन 14 हजार 999 रुपये करण्यात आली आहे.

  • 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची मूळ किंमत 19 हजार 999 रुपये होती. आता या व्हेरिएंटची किंमत 2 हजार 500 रुपयांनी कमी करुन 17 हजार 499 रुपये करण्यात आली आहे.


'लेनोव्हो Z2 प्लस'चे दोन्ही व्हेरिएंट ई-कॉमर्स साईट अमेझॉन इंडिया आणि फ्लिपकार्टवरुन ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. काळा आणि सफेद रंगांमध्ये दोन्ही व्हेरिएंट उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.

'लेनोव्हो Z2 प्लस'चे फीचर्स :

  • ड्युअल सिम (4G, 3G सपोर्ट)

  • 5 इंचाचा एचडी डिस्प्ले (441 ppi पिक्सेल डेन्सिटी)

  • स्नॅपड्रॅगन 820 चिप

  • 13 मेगापिक्सेल बॅक कॅमेरा (1.34 मायक्रोन इमेज सेन्सर)

  • 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा

  • 3500mAh नॉन रिमोव्हेबल बॅटरी

  • वायफाय

  • जीपीएस

  • ब्लूटूथ

  • 4 जी फीचर्स

  • आरको टर्बो चार्जिंग 3.0 फीचर

  • प्री-लोडेड गूगल नाऊ लॉन्चर

  • यू-हेल्थ अॅप