मुंबई: लेनोव्होनं आपल्या टेक वर्ल्ड 2016च्या इव्हेंटमध्ये आपले सगळे नवीन प्रोडक्ट लाँच केले. कंपनीनं मोटो झेड आणि झेड फोर्स या स्मार्टफोनसह काही खास डिव्हाइसचीही झलक पेश केली. ज्यावर अद्याप कंपनी काम करीत आहे.


 

यामध्ये त्यांनी फ्लेक्सिबल स्मार्टफोन आणि एक विशेष टॅबलेटबाबत घोषणा केली. या इव्हेंटमध्ये नवा प्रोटोटाइप स्मार्टफोन आणि फोलियो टॅबलेट देखील घोषणा केली. दरम्यान हा स्मार्टफोन नेमका कधी लाँच करण्यात येणार याबाबत माहिती देण्यात आलेली नाही.

 

 



 

याआधी चीनच्या एक स्टार्टअप कंपनीनं देखील फोल्डेबल स्मार्टफोन प्रोटो टाइप दाखवला होता. या वर्षाच्या शेवटी हा स्मार्टफोन लाँच करण्याची घोषणा केली आहे. हा स्मार्टफोन तसा दिसायला साधारण दिसतो. मात्र त्याला फोल्ड करुन तुम्ही मनगटावर बांधू शकतात. हातावर घड्याळ ज्याप्रमाणे आपण बांधतो त्याचप्रमाणे हा स्मार्टफोन तुम्हाला बांधता येतो. त्यामुळे या स्मार्टफोनला लेनोव्हाचा हा स्मार्टफोन टक्कर देणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.