नवी दिल्लीः लेनोव्होने एअर 13 प्रो हा लॅपटॉप लाँच केला आहे. शाओमीने काल एमआय नोटबुक एअर हा लॅपटॉप लाँच केला होता. शाओमीच्या या लॅपटॉपला टक्कर देत लेनोव्हेने हा जबरदस्त लॅपटॉप बाजारात आणला आहे.

 

 

लेनोव्होच्या एअर 13 प्रो लॅपटॉपमधील रॅम वगळता इतर सर्व फीचर्स जवळपास शाओमी एमआय नोटबुक एअरप्रमाणेच आहेत. शिवाय किंमतही शाओमीच्या लॅपटॉपप्रमाणेच म्हणजे 51 हजार 400 रुपये एवढी आहे.

 

एअर 13 प्रोचे फीचर्स

  • 13.3 इंच स्क्रीन

  • इंटेल स्कायलेक i5 आणि i7 कोअर प्रोसेसर

  • 4GB रॅम