मुंबई : चिनी कंपनी लिनोव्होने १२८ जीबीचा रॅम असलेला लॅपटॉप लॉन्च केला आहे. युजर्सच्या गरजा लक्षात घेत लिनोव्होने या नव्या लॅपटॉपची निर्मिती केली आहे. त्यामुळे स्वप्नवत वाटणारी गोष्ट लिनोव्होने तयार करत युजर्सना खूश केलं आहे.


एका कार्यक्रमात लिनोव्हो कंपनीने हा लॅपटॉप सर्वासमोर आणला. NXT BLD कॉन्फरन्समध्ये या लॅपटॉपचा लॉन्च करण्यात आला. थिंकपॅड पी-52 असं या नव्या लॅपटॉपचं नाव ठेवण्यात आलं आहे. व्हीआर कॅपेबिलिटीससोबत 128 जीबी रॅम आणि 6 टीबी स्टोरेज या लॅपटॉपला देण्यात आलं आहे.


लॅपटॉपचे स्पेसिफिकेशन
लिनोव्होचा थिंकपॅड पी-52मध्ये 15.6 इंचचा 4K टचस्क्रीन देण्यात आला आहे. याशिवाय 1920x1080 पिक्सल रेजॉल्युशनचा डिस्प्ले क्वालिटी असणार आहे. लिनोव्होने यामध्ये 8व्या जनरेशनच्या इंटल जियोन हेक्सा कोर प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे जो क्वाड्रो पी 3200 जीपीयूसोबत येतो. या लॅपटॉपमध्ये तीन यूएसबी 4.1 टाईप ए, दोन यूएसबी सी/थंडरबोल्ड आणि एक एचडीएमआई 2.0, एक मिनी डिस्प्ले पोर्ट 1.4 आणि एक एसडी कॉर्ड रीडरसोबत वाय-फाय, ब्लूटूथ आणि 4जी एलटीईची सुविधा देण्यात आली आहे. या लॅपटॉपचं वजन 2.5 किलो आहे.


लॅपटॉपबाबत माहिती देताना लिनोव्हो कंपनीने म्हटलं की, थिंकपॅड पी-52 पाच ऑपरेटिंग सिस्टमची सुविधा देण्यात आली आहे. ज्यामध्ये विंडोज 10 प्रो वर्कस्टेशनसाठी उपलब्ध आहे, विंडोज 10 प्रो होम उबुंतू आणि लिनक्स देण्यात आलं आहे. लॅपटॉपमध्ये इंफ्रारेड कॅमेरा देण्यात आला आहे. या कॅमेऱ्यात व्हिडीओ कॉलिंगसाठी एचडी वेबकॅमची सुविधा देण्यात आली आहे.