मुंबई : असुसने नवा स्मार्टफोन Asus ZenFone Ares लाँच केला आहे. या फोनचे स्पेसिफिकेशन्स जवळपास गेल्या वर्षी लाँच झालेल्या जेनफोन एआरप्रमाणेच आहेत. या फोनमध्ये असे फीचर्स देण्यात आले आहेत, ज्यामुळे युझर्सना ऑग्मेंटेड रिअॅलिटी आणि व्हर्चुअल रिअॅलिटीचा अनुभव घेता येईल.


तैवानमध्ये या फोनची किंमत 22 हजार 700 रुपये ठेवण्यात आली आहे. या फोनच्या जुन्या व्हर्जनची किंमत भारतात 49 हजार 999 रुपये ठेवण्यात आली होती.

स्पेसिफिकेशन

या फोनमध्ये 5.7 इंच आकाराची स्क्रीन देण्यात आली आहे. स्नॅपड्रॅगन 821 चिपसेट आहे. तर 8GB रॅम आणि 128GB इंटर्नल स्टोरेज आहे. या फोनचा कॅमेरा जबरदस्त आहे. हाय रिजॉल्युशन पिक्सल 3.0 लेसंसह 23 मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. तर आठ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. फोनमध्ये 3300mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.