मुंबई : स्मार्टफोन कंपनी लेनोव्होनं भारतात आपला नवा बजेट स्मार्टफोन K8 नोट लाँच केला आहे. हा लेनोव्हो ब्रॅण्डचा पहिला स्मार्टफोन आहे ज्यामध्ये ड्यूल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.
लेनोव्हो K8 नोट स्मार्टफोनची किंमत 12,999 रुपये आहे. अमेझॉनवर हा स्मार्टफोन 18 ऑगस्टला दुपारी 12 वाजेपासून विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. 3जीबी रॅम आणि 32 जीबी मेमरी आणि 4जीबी रॅम आणि 64 जीबी मेमरी असे दोन व्हेरिएंट असणार आहे. 4जीबी रॅम व्हेरिएंटची किंमत 13,999 रुपये असणार आहे.
यासोबतच आयडिया या स्मार्टफोनवर 343 रुपयात 64 जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग देणार आहे. ज्याची वैधता 56 दिवसांसाठी असणार आहे.
लेनोव्हो K8 नोट स्मार्टफोनचे खास फीचर :
- या स्मार्टफोनमध्ये 5.5 इंच स्क्रीन देण्यात आली असून याचं रेझ्युलेशन 1080x1920 पिक्सल आहे. यात डिस्प्ले कॉर्निंग गोरिल्ला ग्लास आहे.
- यामध्ये डेका कोअर मीडियाटेक Cortex-A53 प्रोसेसर देण्यात आला आहे.
- 3 जीबी आणि 4 जीबी रॅम असे दोन व्हेरिएंट
- या स्मार्टफोनची खासियत म्हणजे याचा कॅमेरा. यामध्ये 13 मेगापिक्सल आणि 5 मेगापिक्सल असा ड्यूल रिअर कॅमेरा देण्यात आला असून 13 मेगापिक्सल फ्रंट कॅमेराही यामध्ये आहे.
- हा स्मार्टफोन अँड्रॉईड 7.1 नॉगटवर आधारित असणार आहेत.
- या स्मार्टफोनची बॅटरी 4000 mAh आहे.