Flipkart Big Freedom Sale : iPhone 6सह अनेक गॅजेटवर सूट
एबीपी माझा वेब टीम | 08 Aug 2017 10:25 PM (IST)
‘द बिग फ्रीडम सेल’मध्ये अनेक बंपर ऑफर देण्यात आल्या आहेत.
मुंबई : फ्लिपकार्टचा ‘द बिग फ्रीडम सेल’ 9 ऑगस्ट ते 11 ऑगस्टपर्यंत असणार आहे. या सेलमध्ये अनेक ऑफर देण्यात आल्या आहेत. या सेलमध्ये आयफोन 6च्या 32 जीबी मॉडेलची किंमत बरीच कमी होण्याचे संकेत फ्लिपकार्टनं दिले आहेत. यासोबतच रेडमी नोट 4च्या सेलवर HDFC क्रेडिट कार्ड यूजरला 10 टक्के अतिरिक्त सूट मिळणार आहे. दरम्यान, या सेलमधील काही ऑफर कंपनीनं जाहीर केल्या आहेत. यामध्ये मोटो M 15,999 रुपये किंमतीचा स्मार्टफोन 12,999 रुपयांना मिळणार आहे. तर 16,999 रुपयांचा मोटो G5 प्लस 14,999 रुपयात खरेदी करता येणार आहे. तर गुगल पिक्सल XL हा 67,000 किंमतीचा स्मार्टफोन 48,999 रुपयात खरेदी करता येईल. तर लेनोवो K6 स्मार्टफोनवरही 1000 रुपयांची सूट देण्यात आली आहे. 9,999 रुपये किंमतीचा हा स्मार्टफोन 8,999 रुपयात खरेदी करता येणार आहे. याशिवाय फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये टीव्ही, लॅपटॉप, टॅबलेट यासारख्या इलेक्ट्रिक वस्तूंवरही सूट मिळणार आहे. यामध्ये 32 जीबी इंच सोनी LED स्मार्ट टीव्हीवरही सूट देण्यात येणार आहे. संबंधित बातम्या : फ्लिपकार्टच्या 'फ्रीडम सेल'ची घोषणा, ग्राहकांसाठी खास ऑफर