मुंबई : लेनोव्होने काही दिवसांपूर्वीच अपकमिंग स्मार्टफोन नोटचा टीझर व्हिडीओ लाँच केला होता. त्यानंतर हा फोन कधी लाँच होणार याची एकच उत्सुकता लागली होती. अखेर हा फोन 9 ऑगस्टला लाँच होणार असल्याचं कंपनीने अधिकृतपणे जाहीर केलं आहे.
या स्मार्टफोनचं नाव K7 असणं अपेक्षित होतं. मात्र कंपनीने K6 नंतर थेट K8 हा स्मार्टफोन बाजारात आणला आहे. यापूर्वी वनप्लसनेही असंच केलं होतं. 3T या फोननंतर थेट वनप्लस 5 हा फोन लाँच करण्यात आला.
काही दिवसांपूर्वीच हा स्मार्टफोन गीकबेंच या बेंचामार्क वेबसाईटवर स्पॉट करण्यात आला होता. या फोनमध्ये अँड्रॉईड 7.1 नॉगट ऑपरेटिंग सिस्टम, 1.4GHz मीडियाटेक हेलियो X20 प्रोसेसर आणि 4GB रॅम असेल.
हा फोन 4GB आणि 3GB रॅम व्हर्जनमध्ये लाँच केला जाणार आहे. या फोनची किंमत काय असेल, याबाबत अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही.