मुंबई : रिलायन्स जिओने सर्वात स्वस्त 4G फीचर फोन आणल्यानंतर दूरसंचार कंपनी आयडियानेही स्वस्त फोन देण्याची तयारी सुरु केली आहे. कंपनी फोनची किंमत कमी करण्यासाठी काम करत आहे.

आयडियाचे व्यवस्थापकीय संचालक हिमांशू कपानिया यांनी याबाबत माहिती दिली. दरम्यान या फोनवर सबसिडी दिली जाणार नाही, हे देखील कंपनीने स्पष्ट केलं आहे.

आयडियाचा हा फोन कधीपर्यंत बाजारात येईल आणि त्याचे फीचर्स काय असतील, याबाबत अजून कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. मात्र या फोनवर सध्या काम सुरु असल्याची माहिती आयडियाने दिली आहे.

रिलायन्स जिओचा सर्वात स्वस्त 4G फीचर फोन

रिलायन्सने जिओप्रमाणे आज आणखी एक धमाका केला आहे. मुकेश अंबानी यांनी रिलायन्सचा 4G VoLTE फीचर फोन लाँच केला आहे. महत्त्वाचं म्हणजे  हा फोन फुकटात मिळणार आहे. मात्र त्यासाठी सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून 1500 रुपये ठेवावे लागतील. हे 1500 रुपये तीन वर्षांनी परत मिळतील.

जिओचा हा फोन टीव्हीला जोडता येणार आहे.

याशिवाय जिओने 153 रुपयांचा प्लॅन लाँच केला आहे.  जिओ फोनवर अवघ्या 153 रुपयात महिनाभरासाठी अनलिमिटेड कॉलिंगसह, अनलिमिटेड डेटा मिळणार आहे.

रिलायन्सची आज नवी मुंबईत महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत मुकेश अंबानींनी महत्त्वाच्या घोषणा केल्या. यापैकी महत्त्वाची घोषणा म्हणजे रिलायन्स जिओचा 4G VoLTE फीचर फोन.

संबंधित बातमी :

जिओ फोन कसा आहे?


‘डेटागिरी’नंतर डिजीटल फ्रीडम, अंबानींकडून घोषणांचा पाऊस


भरसभेत कोकिलाबेन यांना अश्रू अनावर!


रिलायन्सचा धमाका, फुकटात 4G फोन