Twitter Accounts : ट्विटरचे ( Twitter ) नवे मालक क्षणाक्षणाला मोठे बदल करताना दिसत आहेत. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती तसेच टेस्ला ( Tesla ) आणि स्पेसएक्सचे ( SpeceX ) मालक एलॉन मस्क ( Elon Musk ) यांनी ट्विटरची मालकी ( Twitter Deal ) मिळवल्यानंतर अनेक बदल केले आहेत. आता मस्क यांनी ट्विटर अकाऊंट गोठवण्याबाबत मोठी घोषणा केली आहे. मस्क यांनी सांगितलं आहे की, ट्विटर अकाऊंटवर तुमचं नाव किंवा ओळख बदलल्यास व्हेरिफाईट युजरची ( Twitter Verified User ) ब्लू टिक ( Blue Tick ) हटवण्यात येणार आहे. शिवाय ट्विटरवरील पॅरोडी अकाऊंट ( Parody Account ) हटवण्यात येतील, ही कारवाई कायमस्वरुपी असेल. 


ट्विटर अकाऊंटवर नाव बदलल्यास ब्लू टिक गायब


मस्क ट्विट करत ही नवीन अपडेट युजर्सपर्यंत पोहोचवली आहे. तसेच पॅरोडी अकाऊंट कायमस्वरूप हटवण्यात येणार असल्याचं ही त्यांनी सांगितलं आहे. मस्क यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, ट्विटरवर पॅरोडी अकाऊट असेल त्यावर पॅरोडी अकाऊंट असा स्पष्टपणे उल्लेख करावा. अन्यथा पॅरोडी अकाऊंटवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मस्क यांनी दिला आहे. पॅरोडी अकाऊंटवर पॅरोडी अकाऊंट असल्याचा उल्लेख नसेल तर ते खातं निलंबित केलं जाईल. मस्क यांनी आणखी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, तुमच्या ट्विटर अकाऊंटवरील नावामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल केल्यास तुमच्या व्हेरिफाईड अकाऊंटची ब्लू टिक हटवण्यात येईल.






पॅरोडी अकाऊंट कायमस्वरूपी हटवण्यात येणार


ट्विटरवर अनेक पॅरोडी अकाऊंट ( Parody Twitter Account ) आहेत. पॅरोडी अकाऊंट म्हणजे एखादे खाते जे दुसरी व्यक्ती, गट किंवा संस्थेच्या प्रोफाइलचा वापर करुन त्या विषयावर चर्चा करण्यासाठी, उपहासात्मक पोस्ट करण्यासाठी वापरलं जातं. जर कुणी इतरांचा फोटो किंवा माहिती वापरून बनावट खातं बनवून त्याचा वापर करत असेल, तर असे अकाऊंट कायमस्वरूपी हटवण्यात येतील.