Twitter Content Monetization : ट्विटरचे (Twitter) नवे मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांनी घोषणा केली की, ट्विटर लवकरच यूजर्सना त्यांच्या ट्विट्समध्ये मोठा मजकूर जोडण्याची परवानगी देईल. तसेच मस्क यांनी ट्विट केले की, आता ट्विटरवर मॉनेटायझेशनचे फीचर (Twitter Content Monetization) जोडण्याचा निर्णय घेतला आहे. युजर्स युट्युब (You Tube) आणि फेसबुक (Facebook) प्रमाणेच ट्विटरवर त्यांच्या कंटेंटला मॉनिटाईज करू शकतील. एलॉन मस्कने स्वतः ट्विटरवर एका पोस्टद्वारे याची पुष्टी केली आहे. एलॉन मस्क हे ट्विटरचे नवे मालक बनले असून सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये विविध बदल करत असल्याचे दिसत आहे. त्यांनी ट्विटर विकत घेण्यापूर्वीच, त्यांच्याकडे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मबद्दल अनेक तक्रारी होत्या, ज्याची ते अनेकदा चर्चा करत असे.


 


 






युट्युबप्रमाणेच ट्विटर कंटेंटवर कमाई करण्याची सुविधा


आता एलॉन मस्क देखील ट्विटर यूजर्ससाठी कंटेंट मॉनिटाईज करण्याची सुविधा देणार आहे. या अंतर्गत, तुम्हाला जेवढे ट्विट किंवा व्हिडीओ लाइक मिळेल, तेवढ्याच प्रमाणात तुमच्या खात्यात पैशांचा पाऊस पडेल. मस्कने ट्विट करून लिहिले की, लवकरच एक नवीन फीचर जोडले जात आहे. ज्यामध्ये यूजर्स ट्विटरवरच लांब मजकूर लिहून ट्विट करू शकणार आहे. त्यावर कमाई करण्याचा पर्यायही असेल. यासह, ट्विटर खातेधारक YouTube आणि Facebook सारखे कंटेंट मॉनिटाईज करून पैसे कमावण्यास सक्षम असतील. यासाठी एकमात्र अट आहे की, कंटेंट स्वतःचे असावे.


 




 


Youtube पेक्षा होईल अधिक कमाई
आतापर्यंत लाखो लोक यूट्यूबच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये कमवत आहेत. मस्कच्या मते, त्याच पार्श्वभूमीवर ट्विटर आपल्या खातेधारकांनाही कमाई करण्याची संधी देईल. ट्विटर आपल्या खातेधारकांना यूट्यूबपेक्षा जास्त पैसे देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. माहितीनुसार, YouTube कंटेंट क्रिएटर्सना एकूण कमाईपैकी 55 टक्के देते. यामुळे लाखो लोक श्रीमंत होत आहेत. त्याचप्रमाणे आता ट्विटर कंटेंट क्रिएटर्सनाही कमाई करण्याची संधी मिळणार आहे. मात्र कंटेट यूजर्सनी स्वत: तयार केले पाहिजे. इतरांचा मजकूर कॉपी आणि चालवण्यासाठी कोणतेही पैसे दिले जाणार नाहीत. यामुळे तुमचे खाते धोक्यात येऊ शकते. त्यामुळे तुम्हाला तुमची स्वतःचे कंटेंटला मॉनिटाईज करावे लागेल.


ट्विटर यूजर्सना बंपर कमाई करण्याची संधी
एलॉन मस्क ट्विटर खातेधारकांना श्रीमंत करण्यासाठी एक नवीन फीचर जोडणार आहे. यानंतर ट्विटर यूजर्सना बंपर कमाई करण्याची संधी मिळेल. यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची किंवा काहीही करण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त ट्विट करत राहावे लागेल. तुम्ही जितके जास्त ट्विट कराल तितकी तुमची कमाई वाढेल. तुमची कमाई अमर्यादित असेल. म्हणजेच तुम्ही फक्त ट्विट करून हजारो ते लाखो आणि कोट्यवधी रुपये कमवू शकता.


इतर महत्वाच्या बातम्या


Twitter Layoffs : एलॉन मस्क यांचा यु-टर्न, ट्विटरने कामावरून कमी केलेल्या कर्मचाऱ्यांना परत बोलावलं, काय आहे कारण?