SmartPhones Under 20K : सध्या मार्केटमध्ये 20 हजारांच्या रेंजमध्ये अनेक चांगले स्मार्टफोन उपलब्ध आहेत. या फोनमध्ये आपल्याला 5 जी तंत्रज्ञानासह सर्व लेट्स्ट फीचर्स मिळतील. या मिड रेंज फोनमध्ये आपल्याला 8 जीबी रॅम पर्यंत 64 जीबी स्टोरेज आणि 48 मेगापिक्सेल पर्यंतचा कॅमेरा मिळत आहे. 20 हजारच्या रेंजमधले लेटेस्ट स्मार्टफोन कोणते आहेत ते पाहुया.
Realme 8 5G
स्वस्त आणि शानदार फीचर्स असलेले Realme चे फोन लोकांना आवडत आहेत. रियलमी 8 5जी स्मार्टफोनबद्दल बोलायचं तर हा फोन नुकताच भारतात लाँच झाला आहे. कंपनीने या फोनचे 3 व्हेरिएंट बाजारात आणले आहेत. ज्यामध्ये 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या फोनची किंमत 13,999 रुपये आहे. हा तुमच्यासाठी खूप चांगला फोन आहे. तसेच 4 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज फोनची किंमत 14,999 रुपये आहे, तर 8 जीबी रॅम असलेला फोन 16,999 रुपयांमध्ये उपलब्ध असेल. एसडी कार्डद्वारे फोनचं स्टोरेज 1 टीबी पर्यंत वाढवू शकता येतं. या फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 48-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 11 बेस्ड रिअलमी यूआय 2.0 वर काम करतो. यात 6.5 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले आहे. फोनमध्ये ऑक्टाकोर मीडियाटेक डायमेन्शन 700 चिपसेट आणि पंच होल सिस्टम आहे. या फोनची बॅटरी 5000 एमएएच आहे.
OPPO A74 5G
हा फोन देखील नुकताच लाँच झाला आहे. हा फोन 17990 रुपयात खरेदी करू शकता. फोनला 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज आहे. यामध्ये 6.49 इंचाचा फुल एचडी प्लस पंच होल डिस्प्ले आहे. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 480 प्रोसेसर आणि 5000 एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. या फोनमध्ये तुम्हाला ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळेल. ज्यामध्ये 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 2 मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा, 2 मेगापिक्सलचा थर्ड कॅमेरा आणि 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे, जो पंचहोलसह येतो.
Realme Narzo 30 Pro 5G
या फोनची किंमत 16,999 रुपये आहे. फोनमध्ये 6 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेज आहे. आपण फोनचे स्टोरेज 256 जीबी पर्यंत वाढवू शकतो. या फोनला 6.5 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले आहे. हा स्मार्टफोन मीडियाटेक डायमेन्शन 800 यू प्रोसेसर आणि 5000 एमएएच बॅटरीसह आला आहे. ज्यात 30 वॅटचा फास्ट चार्जर आहे. या फोनच्या कॅमेऱ्यायाबद्दल बोलायचं तर यात ट्रिपल रियर कॅमेरा आहे. ज्यामध्ये 48 मेगापिक्सल कॅमेरा आहे. जो एफ / 1.8 अपर्चर, 8 एमपी सेकंडरी कॅमेरा, 2 एमपी थर्ड कॅमेरा आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16 मेगापिक्सलचा सेल्फी व कॅमेरा उपलब्ध आहे.
Moto G 5G
मोटोच्या या फोनमध्ये 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज देण्यात आला आहे. आपण त्याचे स्टोरेज 1 टीबी पर्यंत वाढवू शकतो. या फोनमध्ये 6.67 इंचाचा फुल HD+ LCD IPS HDR10 मॅक्स व्हिजन डिस्प्ले आहे. फोनमध्ये ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 750 जी प्रोसेसर आहे, जो अँड्रॉइड 10 वर काम करतो. मोटो जी 5 जी मध्ये तुम्हाला 5000 एमएएच बॅटरी मिळेल. या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये 48 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सलचा सेन्सर सेकंडरी कॅमेरा, थर्ड 2 मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सर आहे. सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा सेन्सर देण्यात आला आहे. हा फोन 20,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.