मुंबई : जिओचा फीचर फोन खरेदी करण्यासाठी अनेक जण इच्छुक असल्याचं दिसून येत आहे. अनेक स्टोअरमध्ये प्री-बुकींगसाठी नोंदणी सुद्धा करण्यात आलं आहे. पण तुम्ही या फीचर फोनचं बुकींग घरबसल्याही करु शकता. यासाठी तुम्हाला फक्त एक मेसेज करायचा आहे.
तुमचा जिओफोन बुक करण्यासाठी मेसेज बॉक्समध्ये जाऊन टाइप करा JP< तुमचा परिसराचा पिनकोड< तुमच्या जवळच्या जिओ स्टोरचं कोड टाकून हा मेसेज 702 11 702 11 नंबरवर सेंड करा.
या नंबरवर मेसेज केल्यानंतर तुम्हाला रिलायन्स जिओकडून thank you असा मेसेज येईल.
24 ऑगस्टला जेव्हा या फोनची अधिकृत प्री-बुकींग नोंदणी सुरु होईल तेव्हा कंपनी प्री-बुकींगसाठी मेसेज केलेल्या आपल्या ग्राहकांना यासाठी फोन करेल. त्यानंतर हा फोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना कंपनी त्यांच्या जवळच्या जिओ स्टोरचा कोड देईल. तिथं त्यांना जिओचा फीचर फोन उपलब्ध होईल.
जिओ फोनच्या बुकींगसाठी तुम्हाला फक्त आधार कार्डची झेरॉक्स कॉपी द्यावी लागणार आहे. आधार नंबरवरच तुम्हाला जिओ फोन बुक करता येणार आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात जिओफोन ग्राहकांचा हाती येईल अशी आशा व्यक्त करण्यात आहे.
संबंधित बातम्या :
रिलायन्स जिओची आणखी एक धमाकेदार ऑफर