देशात सध्या इलेक्ट्रिक वाहनांची क्रेज वाढताना दिसत आहे. सरकारही इलेक्ट्रिक वाहनं वापरण्यासाठी प्रोत्साहन देण्याचं काम करत आहे. हेच लक्षात घेत TVS ने नवीन इलेक्ट्रिक स्कूटर TVS iQube Electric भारतात लॉन्च केली आहे. याची किंमत 1,08,012 रुपये ठरवण्यात आली आहे. जर तुम्हाला हे खरेदी करायचं असेल, तर कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर डिलरशिप्समार्फत 5000 रुपयांची टोकन अमाउंट देऊन इलेक्ट्रिक स्कूटर बुक करु शकता.


TVS ने या स्कूटरला व्हाइट कलरच्या व्हेरिंएटसह बाजारात लॉन्च केलं आहे. यामध्ये क्रिस्टल क्लियर एलईडी हेडलॅम्प्स,ऑल एलईडी टेल लॅम्प्स आणि एक इल्युमिनेशन लोगो आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर नेक्स्ट जनरेशन TVS SmartXonnect प्लॅटफार्मवर काम करतं.


75 किलोमीटरची रेंज


TVS iQube Electric स्कूटर 4.4 kW ची इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली आहे. ही स्कूटर एकदा फुल चार्ज केल्यानंतर 75 किलोटीमटरपर्यंत चालते. या इलेक्ट्रिक स्कूटरची टॉप स्पीड 78 kmph आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर 4.2 सेकंदांमध्ये0 ते 40 किलोमीटर प्रति तासांच्या वेगाने जाऊ शकते.


हे आहेत फिचर्स


TVS iQube Electric स्कूटरमध्ये अॅडवांस्ड टीएफटी क्लस्टर देण्यात आलं आहे. या स्कूटरमध्ये जियो फेसिंग, रिमोट बॅटरी चार्ज स्टेटस, नेविगेशन असिस्ट, लास्ट पार्क लोकेशन, इनकमिंग कॉल अलर्ट/एसएमएस अलर्ट यांसारखे फिचर्स देण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त यामध्ये काही हायटेक फिचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये क्यू-पार्क असिस्ट, मल्टी-सिलेक्ट इकोनॉमी आणि पॉवर मोड, डे अँड नाईट डिस्प्ले आणि रिजनरेटिव्ह ब्रेकिंगचा समावेश आहे.


Bajaj Chetak सोबत स्पर्धा


TVS iQube Electric ची स्पर्धा भारतात Bajaj Chetak सोबत होणार आहे. ही स्कूटर बाजारात दोन व्हेरिएंट्समध्ये अवेलेबल असणार आहे. याची किंमत एक लाख रुपयांपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. या स्कूटरमध्ये 3 kWh च्या क्षमतेची बॅटरी वापरण्यात आली आहे. या इलेक्ट्रिक मोटर 5.36 bhp च्या पॉवर आणि 16 Nm चा टॉर्क जनरेट करतं. फुल चार्ज केल्यानंतर ही स्कूटर इको मोडमध्ये 95 किलोमीटर आणि स्पोर्ट मोडमध्ये 85 किलोमीटर रेंज देते.


महत्त्वाच्या इतर बातम्या :