मुंबई : भारतीय स्मार्टफोन मेकर कंपनी कार्बनने आपला एन्ट्री लेव्हल अँड्रॉईड स्मार्टफोन A91 स्ट्रोम लॉन्च केला आहे. नव्या हँडसेटला कंपनीने वेबसाईटवर लिस्ट केलं असून, या स्मार्टफोनची किंमत फक्त 2 हजार 899 रुपये आहे.
इंटेक्सने काही दिवसांपूर्वीच आपला 2 हजार 999 रुपयांचा एन्ट्री लेव्हल स्मार्टफोन एक्वा क्लासिक लॉन्च केला होता. कार्बनचा हा स्मार्टफोन इंटेक्सच्या स्मार्टफोनला मोठा स्पर्धक ठरणार आहे.
कार्बन A91 स्ट्रोम ड्युल सिम स्मार्टफोन असून, अँड्रॉईड 5.1 लॉलिपॉप ऑपरेटिंग सिस्टमवर चालणार आहे.
कार्बन A91 स्मार्टफोनचे फीचर्स:
4 इंचाचा स्क्रीन (480x800 पिक्सेल रिझॉल्युशन)
1.2GHz क्वाड-कोर प्रोसेसर
512 एमबी रॅम
2 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा
0.3 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
स्मार्टफोनमध्ये 4 जीबीची इंटरनल मेमरी आणि 32 जीबीपर्यंत मेमरी वाढवण्याची सुविधा असून, कनेक्टिव्हिटीमधअये 3G, जीपीआरएस, ब्लूटूथ, वाय-फाय, एफएम रेडिओ, एज, मायक्रो-यूएसबी 2.0 सारखे फीचर्स आहेत. या स्मार्टफोनमध्ये 2200mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.