मुंबई: चायनीज कंपनी विवोने आपले दोन नवे स्मार्टफोन X7 आणि X7 प्लस चीनमध्ये लाँच केले. X7 ची किंमत 2,498 युआन (25000 रुपये) असून, येत्या 7 जुलैपासून हे स्मार्टफोन विक्रीसाठी बाजारात उपलब्ध होतील. तर X7 प्लस हा स्मार्टफोन 15 जुलैपासून विक्रीसाठी उपलब्ध होईल.
हे स्मार्टफोन गोल्ड आणि रोज गोल्ड कलरमध्ये उपलब्ध आहेत.
विवो X7 आणि X7 प्लसचे जवळपास सर्व फिचर्स एकसारखेच आहेत. दोन्ही स्मार्टफोनमध्ये 16 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे. विशेष म्हणजे, या फ्रंट कॅमेराला फ्लॉश देण्यात आला आहे. तसेच फिंगर प्रिंट सेंसरच्या या स्मार्टफोनमध्ये 4 जीबीची रॅम आहे. तर दोन्ही स्मार्टफोनमध्ये 1.8 GHz स्नॅपड्रॅगन 652 ऑक्टाकोअर प्रोसेसर देण्यात आला आहे.
विवो X7चे स्मार्टफोन ड्यूअल सिममध्ये आहेत. शिवाय या फोनमध्ये 5.2 इंचाची स्क्रिन असून त्याची रिझॉल्यूशन कपॅसिटी 1080 x 1920 पिक्सल आहे. याची स्क्रिन 2.5D कव्हर्ड असेल. हे स्मार्टफोन 5.1च्या लॉलीपॉप ओएसवर काम करतील. X7 मध्ये 13 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा देण्यात आला आहे.
तर X7 प्लसमध्ये 5.7 इंचाची स्क्रिन देण्यात आली आहे. ज्याची रिझॉल्यूशन कपॅसिटी 1080 x 1920 पिक्सल आहे. ती 5.2D कव्हर्ड ग्लास असेल. या स्मार्टफोनची बॅटरी 4000mAhआहे.
कनेक्टिविटीसाठी फोनमध्ये वायफाय, ब्लूट्यूथ, जीपीआरएससारखे ऑप्शन देण्यात आले आहेत.