Kangna ranaut completes 1 million followers - 'Koo' वर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने 1 मिलियनपेक्षा अधिक फॉलोअर्सचा टप्पा पूर्ण केला आहे. या अ‍ॅपच्या लोकप्रियतेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. नुकतीच अनेक नामांकित मंडळी 'कू' अ‍ॅपवर जोडली आहेत. यात माजी भारतीय क्रिकेटर वीरेंद्र सहवाग, अभिनेता रविचंद्र वी, भारतीय क्रिकेटर अभिनव मुकुंद, अ‍ॅटलेटिक्स अनियन मिधुन, स्प्रीचुअल लीडर राघेश्वर भारती आणि स्पोर्ट्स प्रेजेंटर अनंत त्यागीचा समावेश आहे. 


'कू' वर मायक्रोब्लॉगिंग करता येते. मागील चार महिन्यात 'कू'च्या वापरकर्त्यांची संख्या दुप्पट झाली आहे. योग्य हॅशटॅगचा वापर करून वापरकर्त्यांना चांगली ओळख बनवता येते. 'कू' हे भारतीय बनावटीचा अ‍ॅप आहे. 'कू' हा सध्या आठ भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे. 


काय आहे कू?
'कू' हे एक ट्विटर प्रमाणेच पण स्वदेशी मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म आहे. हे वेबसाइटवर आणि गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. ट्विटरप्रमाणे यावरही आपण आपले विचार मांडू शकतो. यात आपले मत मांडण्यासाठी 400 शब्दांची मर्यादा आहे. इथेही आपल्याला हव्या त्या व्यक्तीला आपण फॉलो करु शकतो. आपल्या मोबाईल नंबरच्या माध्यमातून आपण कू वर अकाउंट काढू शकतो तसेच साइन इन करतानाही मोबाईलचा वापर करु शकतो. महत्वाचं म्हणजे यूजर्स आपले फेसबुक, लिंक्ड इन, यूट्यूब तसेच ट्विटर अकाउंट कू शी लिंक करु शकतात. ट्विटर प्रमाणे यावरही हॅशटॅगचा वापर करता येतो. कू वर पोस्ट शेअर करताना ती ऑडिओ अथवा व्हिडीओच्या माध्यमातून शेअर करता येते. आपल्या पोस्टमध्ये इतरांनाही टॅग करता येते.


एबीपी माझा आपल्या प्रेक्षक आणि वाचकांपर्यंत निष्पक्ष आणि परखड अंदाजात आपल्यासमोर बातम्या घेऊन येतं. ताजे अपडेट्स आणि तथ्यपूर्ण बातमीदारीमुळं एबीपी माझाला प्रेक्षकांची पसंती आहे. यामुळं डिजिटल मीडियात एबीपी माझाच्या प्रत्येक सोशल प्लॅटफॉर्मला सर्वाधिक फॉलोअर्स आहेत. सोशल मीडियावर वाढत्या लोकप्रियतेमुळं आता एबीपी माझा Koo अ‍ॅपवर देखील आलं आहे. कू अ‍ॅपवरही आपल्याला एबीपी माझाकडून ताजे अपडेट्स आणि विश्लेषण ऐकायला आणि पाहायला मिळतील.  


एबीपी माझाचे वेगवेगळे डिजिटल प्लॅटफॉर्म्स
 
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv  
          
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv


 


एबीपी माझाचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स फेसबुक, ट्विटर, टेलिग्राम यूट्यूबसोबतच Koo अ‍ॅपवर देखील आपण आता फॉलो करु शकता. कू अ‍ॅपवर एबीपी माझाला https://www.kooapp.com/profile/ABPMajha   इथे फॉलो करा.