मुंबई - टाटा मोटर्सकडून भारतातली पहिली मिनी-एसयुव्ही कॅटेगिरीतली टाटा पंच गाडी बाजारात दाखल झाली आहे. ऑटोमेकर कडून देण्यात आलेल्या रेटिंगमध्ये या कारने सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून प्रौढांसाठी फाईव्ह स्टार तर मुलांसाठी फोर स्टार रेटिंग दिले आहेत. अवघ्या २१ हजार रुपायापासून गाडीचं बुकिंग सुरु आहे.
सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही प्रकारातली ही टाटा पंच भारत, यूके आणि इटलीतल्या टाटा मोटर्सच्या स्टुडिओमध्ये डिझाईन करण्यात आलेली आहे. ही गाडी आकाराने लहान असली तरी कमीत कमी जागेत जास्तीची स्पेस देऊन सुरक्षिततेला यामध्ये महत्त्व देण्यात आलं आहे.
नवीन पंच ALFA (Agile Light Flexible Advanced) आर्किटेक्चरची पहिली SUV आहे. एसयूव्हीच्या डीएनएसह ही हॅचबॅकची क्षमता देते असं टाटा मोटर्सने सांगितले आहे.
टाटा पंचकडे ARAI- प्रमाणित इंधन कार्यक्षमता आहे. मॅन्युअल ट्रान्समिशनवर 18.97 किमी प्रति लीटर आणि अटोमॅटिक ट्रान्समिशनवर 18.82 किमी प्रति लिटर गाडी धावू शकते अशी माहिती ऑटोमोबाईल तज्ज्ञांनी दिली आहे.
5 स्टार सुरक्षा रेटिंग
ही देशातील सर्वात सुरक्षित कार असल्याचा दावाही करण्यात आला आहे. ग्लोबल एनसीएपी क्रॅश टेस्टमध्ये याला 5 स्टार रेटिंग मिळाले आहे. एवढेच नाही तर या गाडीने भारतातील इतर सर्व वाहनांना एकूण गुणांमध्ये मागे टाकलं आहे. प्रौढ सुरक्षा रेटिंगमध्ये 17 पैकी 16.45 गुण मिळवले. त्याचप्रमाणे, मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या एसयूव्ही 49 पैकी 40.89 गुण मिळवले आहेत. सुरक्षेसाठी, यात ड्युअल एअर बॅग्स, एबीएस विथ ईबीसी, कॉर्नरिंग फंक्शनसह फ्रंट फॉग दिवे, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, रियर डिफॉगर आणि पंचर रिपेअर किट अशा सुविधा देण्यात आल्या आहेत.
इंजिन आणि परफॉर्मन्स
टाटाच्या नव्या एसयूव्हीमध्ये 1.2-लीटर चे 3-सिलेंडर नॅचुरली-एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन दिलं आहे. हेच इंजिन अल्ट्रोज, टिगोर आणि टियागो मध्येही आहे. हे इंजिन 6,000rpm वर 85bhp की पावर आणि 3,300rpm वर 113Nm का पीक टॉर्क जेनरेट करतं. इंजिन 5-स्पीड मॅन्युअल आणि एएमटी (ऑटोमेटेड मॅन्युअल ट्रान्समिशन) सोबत जोडले गेले आहे. यात दोन ड्रायव्हिंग मोड आहेत - इको आणि सिटी. यात क्रूझ कंट्रोल आणि निष्क्रिय स्टार्ट स्टॉप सिस्टमची वैशिष्ट्ये देखील आहेत. गाडीच्या किंमतीविषयी सांगायचं झालं तर 5 लाख 49 हजार रुपायापासून ते 6 लाख 39 हजार, 7 लाख 29 हजार आणि टॉप मॉडेल 8 लाख 49 हजार रुपये इतकी आकारली जाणार आहे.
व्हेरिएंट आणि किंमत
कार एकूण 4 ट्रिम (PARSONA) मध्ये आणली गेली आहे: Pure, Adventure, Accomplished आणि Creative . मॅन्युअल ट्रान्समिशनसह प्युअर व्हेरिएंटची किंमत 5.49 लाख रुपये आहे. एमटी गिअरबॉक्ससह ,Adventure, Accomplished आणि Creative प्रकारांची किंमत अनुक्रमे 6.39 लाख, 7.29 लाख आणि 8.49 लाख रुपये आहे. एएमटी व्हेरिएंटसाठी तुम्हाला अतिरिक्त 60 रुपये द्यावे लागतील. विशेष गोष्ट म्हणजे या किंमती प्रास्ताविक आहेत, ही किंमत 31 डिसेंबर 2021 पर्यंत वैध असेल.
टाटा पंचमध्ये बऱ्याच गोष्टी देण्यात आल्या आहेत. पूर्णपणे स्वयंचलित तापमान नियंत्रण, अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, ऑटो फोल्ड ओआरव्हीएम, स्टीयरिंग माऊंटेड कंट्रोल्स, टिल्ट स्टीयरिंग आणि फास्ट यूएसबी चार्जरसारख्या अनेक गोष्टी यात आहेत. टाटा पंचला मायक्रो एसयूव्ही सेगमेंटमध्ये आकर्षक ऑफर आहे. इतर वैशिष्ट्यांविषयी सांगायाचं झालं तर, यात शॉट डाउन ड्रायव्हर विंडो, अँड्रॉइड ऑटो आणि Appleपल कारप्लेसह 7-इंच हर्मन इन्फोटेनमेंट सिस्टम, 7-इंच टीएफटी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि आयआरए कनेक्टेड कार तंत्रज्ञान आहे. नवीन टाटा पंच मारुती सुझुकी इग्निस, निसान मॅग्नाइट, रेनॉल्ट किगर आणि स्विफ्ट आणि ग्रँड आय 10 निओस यांच्याशी स्पर्धा करेल.