वॉशिंग्टन : हॅलो... अरे माझी बॅटरी लो झालीय, माझा फोन स्विच ऑफ होईल! असं वाक्यं आपल्याला बऱ्याचदा ऐकायला मिळतं. त्यामुळे फोनची बॅटरी चार्ज करणं हे एक नित्याचं काम झालं आहे. पण समजा, जर बॅटरी नसलेलाच मोबाइल फोन तुमच्या हाती आला तर? हो... हे आता हे शक्य होणार आहे.
काही तज्ज्ञांनी एक असा मोबाइल फोन तयार केला आहे की, ज्याला बॅटरीची गरजच नाही. हा शोध लावणाऱ्या तज्ज्ञांमध्ये एका भारतीय वंशाच्या रिसर्चरचाही समावेश आहे. बॅटरीशिवाय चालणारा हा फोन रेडिओ सिग्नल किंवा सोलर एनर्जीवर चालू शकणार आहे.
फोनवर संभाषण करत असताना त्यातून निघाणाऱ्या ध्वनीतूनही हा मोबाइल उर्जा घेऊ शकतो. असा दावा रिसर्चरनं केला आहे. या मोबाइलमधून स्काईप कॉलही करता येणार आहे.
तंत्रज्ञानाशी निगडीत एका जर्नलच्या रिपोर्टमधून याबाबत माहिती देण्यात आली आहे. हा फोन प्रोटोटाइपमधून कम्युनिकेट करु शकतं असं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.
युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टनचे असोसिएट प्रोसेसर गोलाकोटा यांच्या मते, 'आम्ही एक असा फोन बनवला आहे की, जो शून्य उर्जामध्येही काम करु शकतो. हा फोन सुरु ठेवण्यासाठी तुम्हाला पर्यावरणाकडून उर्जा घ्यावी लागेल. या डिव्हाइसचं नेमकं डिझाइन कसं असायला हवं याचा सध्या आम्ही विचार करत आहोत.'