चेन्नई : मद्रास उच्च न्यायातील एका न्यायमूर्तींनी महिलांनी व्हटसअॅपवर स्वत:चा डीपी ठेवताना सावधानी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. एका सोळा वर्षीय बलात्कार पीडित तरुणीवरील खटल्याचा निकाल देताना न्यायमूर्तींनी हा सल्ला दिला.
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, न्यायमूर्ती एस. वैद्यनाथ यांनी आपल्या निकालपत्रात व्हाटसअॅपच्या माध्यमातून सायबर क्राइमच्या संख्येत वाढ होत आहे. यासाठी महिलांनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. त्यामुळे महिलांना व्हाटसअॅपवर फोटो अपलोड करताना, किंवा व्हिडिओ शेअर करताना सतर्कता बाळगावी, असे सांगितले आहे.
वास्तविक, आजच्या डिजिटल युगात सर्वांनीच सतर्क राहण्याची गरज आहे, पण महिलांबाबतीत घडणाऱ्या घटनांची संख्या पाहता त्यांनी याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मेहसाणा जिल्ह्यातील सूरज नावच्या गावात फेब्रुवारीत झालेल्या ग्रामसभेने तरुणींचा मोबाईल वापरण्याचा अधिकार काढून घेतला आहे.
काही दिवसांपूर्वीही हॉलीवूड सेलिब्रेटींचे नग्न फोटो नेट हॅकर्सनी इंटरनेटवर लीक केले होते.