मुंबई : व्हॉट्सअॅप कायमच आपल्या यूझर्ससाठी नवनवे फीचर्स घेऊन येत असतं. आता व्हॉट्सअॅप यूझर्सना आणखी काही आकर्षक फीचर्स अनुभवयाला मिळणार आहेत. जर्मन पब्लिकेशन ‘मेकरकॉफ’ने व्हॉट्स अॅपच्या आगामी फीचर्सबाबत माहिती दिली आहे. ‘मेकरकॉफ’ने दिलेल्या माहितीला व्हॉट्सअॅपने अद्याप दुजोरा दिलेला नाही.
व्हॉट्सअॅपच्या नव्या फीचर्समध्ये म्युझिक शेअरिंग, इमोजी, मेन्शन, पब्लिक ग्रुप इन्व्हाईट लिंक इत्यादींचा समावेश आहे.
म्युझिक शेअरिंग
म्युझिक शेअरिंग फीचर्सच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमधील गाणी शेअर करु शकता. याआधी गाणी शेअर केल्यास ऑडिओ फाईल म्हणून शेअर व्हायची. मात्र, नव्या फीचरनंतर म्युझिक आयकॉनसह शेअर होतील. शिवाय, अॅपल म्युझिकवरुन गाणी ट्रॅक करण्याची सुविधाही या फीचरमध्ये असेल. तुमच्या व्हॉट्सअॅप काँटॅक्टमध्ये कुणालाही गाणी पाठवू शकता आणि रिसिव्ह करणारा यूझर आयकॉनवर टॅप करुन गाणं ऐकू शकतो.
इमोजी
नव्या अपडेटनंतर इमोजींचा आकारही वाढवण्यात येणार असल्यची माहिती ‘मेकरकॉफ’ने दिली आहे. आताच्या इमोजींच्या तीनपट नव्या इमोजी असणार आहेत.
मेन्शन
फेसबुक, ट्विटरवर यूझर ज्याप्रमाणे समोरील व्यक्तीला मेन्शन करु शकतात, त्याप्रमाणे आता व्हॉट्सअॅपवरही मेन्शन करता येणार आहे. त्यादृष्टीने व्हॉट्सअॅपकडून प्रयत्न सुरु असल्याची माहिती ‘मेकरकॉफ’ने दिली आहे.
पब्लिक ग्रुप इन्व्हाईट लिंक
व्हॉट्सअॅप लवकर असं एक फीचर आणणार आहे, ज्याच्या माध्यमातून पब्लिक ग्रुपमध्ये चॅटसाठी इन्व्हाईट पाठवता येणार आहे. इतर मेंबर्सना पब्लिक ग्रुपमध्ये जोडण्यासाठी तुम्हाला या लिंकचा फायदा होईल.