मुंबई : दूरसंचार क्षेत्रात दबदबा निर्माण केल्यानंतर रिलायन्स जिओला आता दूरसंचार विभागाकडून नव्या सीरिजचे नंबर देण्याची परवानगी मिळाली आहे. हा नंबर '6' सीरिजचा असल्याची माहिती आहे.
रिलायन्स जिओला 6 सीरिजचा एमएससी (मोबाईल स्विचिंग कोड) जारी करण्यासाठी दूरसंचार विभागाकडून परवानगी मिळाली आहे. telecomtalk च्या रिपोर्टनुसार जिओच्या काही ठराविक सर्कलमध्येच 6 सीरिजचे नंबर वितरीत केले जातील.
सध्या मिळालेल्या परवानगीनुसार जिओ एमएससी नंबर आसाम, राजस्थान आणि तामिळनाडूमध्ये वितरीत करणार आहे. राज्यस्थानमध्ये 60010-60019, आसाममध्ये 60030-60039 आणि तामिळनाडूमध्ये 60030-60039 असा MSC कोड असेल, असं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.
जिओने या सीरिजचे नंबर दिले तर 6 सीरिजचे नंबर देणारी ही पहिलीच दूरसंचार कंपनी असेल. आतापर्यंत 9, 8 आणि 7 या सीरिजचे नंबर जारी करण्यात आले आहेत. दूरसंचार विभागाने या सीरिजला परवानगी देण्यामागे जिओचे वाढते युझर्स हे कारण असल्याचं बोललं जात आहे.