मुंबई: मोफत मोबईल कॉल्स आणि मोबाईल इंटरनेट देणाऱ्या रिलायन्स जियोनं ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आता अजून एक नवी ऑफर आणणार आहे. तब्बल १०० जीबीचा डेटा फक्त ५०० रुपयांत देण्याचा रिलायन्स जिओचा विचार आहे.


घरगुती इंटरनेटसाठी (होम ब्रॉडबँड सर्विसेज- जियो फाइबर) हा प्लॉन रिलायन्स जिओनं आणला आहे. सध्याच्या घडीला बाजारात इतका स्वस्त किंमतीत इंटरनेट सेवा कुठलीच कंपनी देत नाही. त्यामुळे जर हा प्लान रिलायन्सनं लॉन्च केला तर इतर कंपन्यांना त्याचा चांगलाच फटका बसण्याची शक्यता आहे.

काही शहरांमध्ये या सर्व्हिसचं फ्री ट्रायलही सुरु झालं आहे. सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये ही ऑफर लाँच केली जाऊ शकते. या वर्षी 100 शहरांमध्ये ही ऑफर लाँच करण्याचा प्रयत्न जिओ करणार आहे.

जिओनं दूरसंचार क्षेत्रात पाऊल ठेवल्यापासून प्रतिस्पर्ध्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. त्यात आता या नव्या ऑफरनं जिओ आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत आहे.

संबंधित बातम्या:

रिलायन्स जिओ 4G लॅपटॉप बनवणार?


टेलिकॉमनंतर जिओ आता DTH क्षेत्रात सर्वात स्वस्त सेवा देणार?


जिओ इफेक्ट : एअरटेलची मोठी घोषणा, देशभरात रोमिंग फ्री


व्हायरल सत्य : 18 जानेवारीनंतर जिओ सिम बंद होणार?