नवी दिल्ली : रिलायन्स जिओ यूझर्सचा डेटा हॅक केल्याचा दावा एका वेबसाईटने केला आहे. 'Magicapk' या वेबसाईटवर जिओ यूझर्सचा डेटा हॅक झाल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यानंतर या वेबसाईटला रिपोर्ट करुन सस्पेंड करण्यात आले आहे.
जिओने वेबसाईटवर सर्वच्या सर्व म्हणजे 12 कोटी यूझर्सची माहिती अपलोड केली होती का, याबाबतही अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, वेबसाईटवर जुने नंबर सर्च करुन पाहिल्यानतंर त्या नंबरशी संबंधित आयडी समोर आल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्सने केले आहे.
जिओचं स्पष्टीकरण
जिओच्या प्रवक्त्यांच्या म्हणण्यानुसार, "या वेबसाईटवर असणारा डेटा अधिकृत नाही. यासंदर्भात सर्व माहिती आम्ही कायदेशीर कारवाईसाठी संबंधित यंत्रणांना दिली आहे."
"वेबसाईटकडून करण्यात हॅकिंगचा दावा खोटा आहे. आम्ही या सर्व प्रकाराची चौकशी करत आहोत. आतापर्यंतच्या चौकशीनुसार वेबसाईटकडून खोटा दावा करण्यात आला आहे. जिओच्या यूझर्सचा डेटा सुरक्षित असून, गरजेच्या ठिकाणीच वापर केला जातो. त्यामुळे या वेबसाईटविरोधात कायदेशीर कारवाईसाठी प्रयत्न करणार आहोत.", असेही जिओच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले आहे.
'फोन एरिना' या टेक वेबसाईटचे प्रमुख वरुण कृष्णन यांनी ट्वीट करुन यासंदर्भात माहिती दिली होती की, "जिओच्या 12 कोटी यूझर्सचा डेटा लीक झाला असून, हे भारतातील आतापर्यंत सर्वात मोठं हॅकिंग ठरु शकतं."
https://twitter.com/varunkrish/status/884079006798143488