मुंबई : जिओ फोन देशाची डिजीटल गरज पूर्ण करण्यासाठी वचनबद्ध आहे. सुरुवातीलाच 60 लाख ग्राहकांनी जिओ फोन बुक केला आहे. लवकरच पुढील बुकिंगसाठी तारीख जाहीर केली जाईल, अशी घोषणा रिलायन्स जिओने केली आहे.

रिलायन्सने 21 जुलै रोजी पहिल्या सर्वात स्वस्त 4G फीचर फोनची घोषणा केली होती. या फोनची किंमत शून्य रुपये असून 15 रुपयांच्या अनामत रकमेवर हा फोन खरेदी करता येणार आहे.

24 ऑगस्ट रोजी या फोनची बुंकिंग सुरु झाली. मात्र जास्त प्रतिसाद मिळाल्यानंतर जिओने या फोनची बुकिंग बंद केली. एकाच दिवसात 60 लाख ग्राहकांनी हा फोन बुक केला होता.

फीचर फोन वापरत असलेले 50 कोटींपेक्षा जास्त ग्राहक जिओचं लक्ष्य आहेत. या 50 कोटींपेक्षा जास्त ग्राहकांना इंटरनेटशी जोडण्याची घोषणा जिओने केली होती.

जिओफोन सिंगल सिम फोन आहे. ज्यामध्ये फक्त जिओ सिम सपोर्ट करेल. या फोनमध्ये 2.4 इंचीचं क्यूव्हीजीए डिस्प्ले देण्यात आलं आहे. तसेच यात न्यूमेरिक कीबोर्डही आहे. व्हॉईस कमांडनं या फोनमध्ये मेसेज, कॉल आणि गुगल सर्च करता येणर आहे. तसेच या फोनमध्ये मायक्रो एसडी कार्डही देण्यात आलं आहे. तसेच या फोनमध्ये बेसिक कॅमेराही देण्यात आला आहे.

संबंधित बातम्या :

.... तर 1500 रुपये जप्त होतील, जिओ फोनच्या 7 अटी


जिओ फोनची किंमत 2500 रुपये, ग्राहकांना फक्त 1500 रुपयात!


रिलायन्सने जिओ फोनची बुकिंग नेमकी का थांबवली?