नवी दिल्ली : दूरसंचार कंपनी भारती एअरटेलने सेलकॉनसोबत मिळून स्वस्त 4G फोन लाँच केला आहे. या फोनची किंमत 1349 रुपये आहे. हा स्मार्टफोन एअरटेलच्या ‘माझा पहिला स्मार्टफोन’ (मेरा पहला स्मार्टफोन) या उपक्रमाचा एक भाग आहे.

'सेलकॉन स्मार्ट 4G' जो 3500 रुपयात बाजारामध्ये उपलब्ध आहे. यामध्ये 4 इंच आकाराची स्क्रीन, ड्युअल सिम स्लॉट, एफएम रेडिओ आणि अँड्रॉईड ओएस सिस्टम आहे. गुगल प्लेच्या सर्व सुविधा मिळतील, ज्यामध्ये फेसबुक, यूट्यूब आणि व्हॉट्सअप यांचा समावेश आहे.

हा फोन माय एअरटेल अॅप, विंग म्युझिक आणि एअरटेल टीव्ही अॅपसोबत प्रीलोडेड येईल. 169 रुपयांच्या मासिक शुल्कामध्ये हा फोन एअरटेलने लाँच केला आहे. या पॅकमध्ये डेटा आणि कॉलिंगची सुविधा मिळणार आहे.

1500 रुपयांचा कॅशबॅक मिळवा

ही ऑफर मिळवण्यासाठी तुम्हाला 2849 रुपये डाऊनपेमेंट करावं लागेल. त्यानंतर सलग 36 महिने 169 रुपयांचा रिचार्ज करावा लागेल. 18 महिन्यांनी 500, 36 महिन्यांनंतर 1000 आणि 36 महिन्यांनंतर तुम्हाला 1500 रुपये कॅशबॅक मिळेल. एकूण 1500 रुपये ग्राहकांना परत मिळतील. अशा पद्धतीने हा फोन ग्राहकांना केवळ 1349 रुपयांमध्ये मिळणार आहे.

एअरटेल-कॉर्बन A40

एअरटेलने यापूर्वीही कार्बनसोबत मिळून A40 हा 1399 रुपयांचा स्मार्टफोन लाँच केला आहे. स्मार्टफोन खरेदी केल्यानंतर तम्हाला 2899 रुपये डाऊनपेमेंट द्यावं लागेल. सलग 36 महिने 169 रुपयांचा रिचार्ज करत राहिल्यानंतर टप्प्याटप्प्याने 1500 रुपयांचा कॅशबॅक मिळेल.