मुंबई : व्हॉट्सअॅप रिकॉल फीचरची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. हे सर्व दावे आतापर्यंत इटर्नल कोडच्या आधारावर करण्यात येत होते. मात्र आता WABetainfo ने दावा केला आहे की, 'Delete for Everyone' या कथित नावाने असलेलं ही फीचर अँड्रॉईड, आयफोन आणि विंडोजसाठी रोल आऊट करण्यात आलं आहे.
https://twitter.com/WABetaInfo/status/924321355541213184
मेसेज पाठवणाऱ्या आणि मेसेज घेणाऱ्या दोन्हीही युझर्सकडे व्हॉट्सअॅपचं हे लेटेस्ट व्हर्जन असेल तरच हे फीचर काम करणार आहे. व्हॉट्सअॅप वेबवर हे फीचर काम करेन, असाही दावा करण्यात आला आहे. या फीचरसाठी मिनिटांची मर्यादा असेल. तुम्ही मेसेज पाठवल्यानंतर सात मिनिटांच्या आतच तो डिलीट करु शकता.
हे फीचर तुम्हाला कधी मिळणार?
व्हॉट्सअॅपचे लाखो युझर्स आहेत. त्यामुळे प्रत्येकापर्यंत हे फीचर पोहोचण्यासाठी वेळ लागू शकतो. अपडेट येताच तुम्हाला नॉटिफिकेशन येईल. वेब अर्थात डेस्कटॉप आणि मोबाईलसाठीही हे फीचर उपलब्ध असेल.
या फीचरमध्ये मेसेज डिलीट करताना आता तीन पर्याय असतील. डिलीट फॉर एव्हरीवन, डिलीट फॉर मी आणि कॅन्सल असे तीन पर्याय या नव्या अपडेटनंतर तुम्हाला येतील. डिलीट फॉर एव्हरीवन केल्यास समोरच्या व्यक्तीकडचाही मेसेज डिलीट होईल. तर डिलीट फॉर मी केल्यास तुमच्या मोबाईलमधून मेसेज डिलीट होईल, असं WABetainfo ने म्हटलं होईल.
पुढील आठवड्यापासून प्रत्येक युझरला हे फीचर मिळण्याची शक्यता आहे. सध्या अँड्रॉईड, विंडोज आणि अपलसाठी हे फीचर मिळणं सुरु झालं आहे.
व्हॉट्सअॅपचं मच अवेटेड रिकॉल फीचर तुम्हाला कधी मिळणार?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
30 Oct 2017 11:06 AM (IST)
WABetainfo ने दावा केला आहे की, 'Delete for Everyone' या कथित नावाने असलेलं ही फीचर अँड्रॉईड, आयफोन आणि विंडोजसाठी रोल आऊट करण्यात आलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -