नवी दिल्ली : जिओ फोनची अधिकृत बुकिंग 24 ऑगस्टला सुरु होणार आहे. मात्र दिल्ली एनसीआरमध्ये काही ऑफलाईन स्टोअर्समध्ये आत्तापासूनच प्री-बुकिंग सुरु झाल्याचं वृत्त 'गॅजेट 360' ने दिलं आहे. 15 ऑगस्ट रोजी हा फोन लाँच होणार आहे.

जिओ फोनसाठी फक्त आधार कार्डची गरज

जिओ फोनची बुकिंग करताना तुम्हाला अधिकृत जिओ फोन विक्रेत्याकडे आधार कार्डची एक झेरॉक्स द्यावी लागेल. एक व्यक्ती एका आधार कार्डवर देशात एकच फोन खरेदी करु शकतो. त्यामुळे तुम्हाला अनेक फोन बुक करण्याची इच्छा असेल तर तसं करता येणार नाही. आधार कार्ड दिल्यानंतर नोंदणी होईल, त्यानंतर टोकण नंबर देण्यात येईल. हा टोकण नंबर फोन घेताना उपयोगी येईल.

जिओ फोनसाठी किती पैसे लागणार?

जिओ फोन हा शून्य रुपये किंमतीमध्ये असेल, मात्र अनामत रक्कम म्हणून 1500 रुपये द्यावे लागतील, अशी घोषणा रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी केली होती. मात्र ऑफलाईन फोन खरेदी करताना तुम्हाला आधार नंबर व्यतिरिक्त कशाचीही गरज नाही. फोन हातात पडेल तेव्हा 1500 रुपये द्यावे लागतील. हे 1500 रुपये तीन वर्षांनी परत मिळतील.

जिओ फोन हातात कधी पडणार?

जिओ फोनची आत्ता बुकिंग केल्यास डिलीव्हरी 1 ते 4 सप्टेंबर या काळात मिळण्याची शक्यता आहे. पुढे बुकिंगची संख्या वाढल्यास फोन उशीराही मिळू शकतो. आधी बुक करणाऱ्या ग्राहकालाच अगोदर फोन मिळणार आहे.

जिओ फोन 24 ऑगस्टपासून माय जिओ अॅप, जिओची वेबसाईट किंवा रिलायन्स स्टोअर्समध्ये जाऊन बुक करु शकता.

संबंधित बातम्या :

जिओ फोनसाठी नोंदणी सुरु, मोफत फोन मिळवण्यासाठी काय कराल?


जिओ फोनमध्ये ड्युअल सिम स्लॉट नसणार!


खुशखबर! जिओ फोनमध्ये व्हॉट्सअॅपचं स्पेशल व्हर्जन चालणार?


‘डेटागिरी’नंतर डिजीटल फ्रीडम, अंबानींकडून घोषणांचा पाऊस


भरसभेत कोकिलाबेन यांना अश्रू अनावर!


रिलायन्सचा धमाका, फुकटात 4G फोन