मुंबई: एक एप्रिलपासून जिओ आपली मोफत सेवा बंद करणार आहे. त्यामुळे यापुढे जिओसाठी ग्राहकांना पैसे मोजावे लागणार आहे. पण तरीही अनेक ग्राहक जिओलाच पसंती देतील असं ब्रोकरेज फर्म बर्नस्टीननं केलेल्या सर्व्हेतून ही माहिती समोर आली आहे.
या सर्व्हेमध्ये म्हटलं आहे की, 'आम्हाला असं वाटत होतं की, जिओची ऑफर संपल्यानंतर अनेक यूजर्स जिओ वापरणं बंद करतील. पण आम्हाला या सर्व्हेमध्ये वेगळंच चित्र पाहायला मिळालं'
'ग्राहक सेवा, डेटा कव्हरेज, डेटा स्पीड आणि हॅण्डसेट चॉईस यामध्ये जिओनं सर्वाधिक गुण मिळवले आहेत.' असंही या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे.
रिपोर्टमध्ये असंही सांगण्यात आलं आहे की, बहुतेक 2जी/3जी यूजर्स पुढच्या वर्षी 4जी फोन खरेदी करु शकतात. त्यातील 80 टक्के लोकांची पसंती ही जिओला आहे.
सर्व्हेत असंही दिसून आलं आहे की, 303 रुपये प्रति महिना सेवा शुल्क आकारल्यानंतरही यूजर्स जिओची साथ सोडणार नाही. 67 टक्के यूजर्सचं म्हणणं आहे की, जिओ सिम हे त्यांचं दुसरं सिम आहे. त्यातील 63 टक्के लोकांचं म्हणणं आहे की, त्यांना जिओ हे आपलं पहिलं ऑपरेटर बनवण्याच्या तयारी आहेत. सर्व्हेतील केवळ दोन टक्के यूजर्सनं जिओ बंद करण्याचा मत व्यक्त केलं आहे.