मुंबई: अॅपलनं आज (21 मार्च) आपल्या आयफोन 7 सीरीजमधील नवा 'प्रोडक्ट RED' स्पेशल एडिशन लाँच केला आहे. हा नवा स्मार्टफोन लाल रंगाच्या रिअर बॉडीसोबत पाहायला मिळणार आहे. आयफोननं पहिल्यांदाच आपला ट्रेडिशनल कलर सोडून लाल रंग आणला आहे. आयफोन 7 लाँच करताना कंपनीनं जेट ब्लॅक व्हेरिएंट आणला होता.


आयफोन 7 आणि 7प्लस लाल रंगातील 128 जीबी आणि 256 जीबी मॉडेल उपलब्ध आहे. हा डिव्हाईस अॅपलच्या वेबसाईटवर 749 डॉलर एवढ्या किंमतीला उपलब्ध आहे. या नव्याची स्मार्टफोन विक्री अमेरिकेसह 40 देशात 24 मार्चपासून सुरु होईल.



या नव्या आयफोनबद्दल अॅपलचा सीईओ टीम कूक म्हणाला की, 'हे आमचं आणि REDच्या भागीदारीतील सर्वात मोठं प्रोडक्ट आहे.' आयफोन 7मध्ये 4.7 इंच डिस्प्ले देण्यात आला आहे. याचं रेझ्युलेशन 1334 x 750 आहे. ज्यामध्ये 1920 x 1080  पिक्सल रेझ्युलेशन आहे.



नव्या आयफोन जनरेशनसोबत अॅपलनं नव्या प्रोसेसर चिप A10 फ्यूजनचा वापर केला आहे. अॅपलचा दावा आहे की, A10 फ्यूजन आतापर्यंतचा सर्वात चांगला प्रोसेसर आहे. यामध्ये 7 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा अणार आहे. तर 12 मेगापिक्सल रिअर कॅमेरा असणारआहे.