मुंबई : रिलायन्स जिओने जूनमध्ये 18.8 Mbps च्या डाऊनलोड स्पीडसह पुन्हा एकदा सर्वात वेगवान 4G मोबाईल नेटवर्क सर्व्हिस प्रोव्हायडरमध्ये अव्वल स्थान पटकावलं आहे. ट्रायने यासंदर्भातील माहिती आणि आकडेवारी जाहीर केली आहे.


जिओचा जूनमध्ये सरासरी डाऊनलोड स्पीड 18.8 Mbps होता, तर मे महिन्याचा सरासरी डाऊनलोड स्पीड 19.12 Mbps होता. त्यामुळे एकंदरीतच इतर इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर कंपन्यांमध्ये जिओ सरस ठरते आहे.

रिलायन्स जिओ भारतीय मोबाईल ब्रॉडबँड सेवा बाजारात गेल्या सात महिन्यांपासून इतर 4G मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडर कंपन्यांच्या तुलनेत सातत्याने पुढे आहे.

ट्रायच्या आकडेवारीनुसार 4G इंटरनेट स्पीड (जून 2017)

  1. रिलायन्स जिओ - 18.8 Mbps

  2. व्होडाफोन – 12.29 Mbps

  3. आयडिया – 11.68 Mbps

  4. एअरटेल – 8.23 Mbps


ट्राय आपल्या माय स्पीड अॅपच्या मदतीने रिअल टाईमवर डेटा डाऊनलोड स्पीड कलेक्ट आणि कॅल्क्युलेट करते. इतर टेलिकॉम कंपन्यांनी 4G मोबाईल स्पीडची आकडेवारी प्रकाशित केली नाही.

3G इंटरनेट स्पीडमध्ये व्होडाफोनची बाजी!

3 जी इंटरनेट स्पीडमध्ये व्होडाफोनने बाजी मारली आहे. व्होडाफोन 5.65 Mbps स्पीडसोबत पहिल्या स्थानावर आहे, तर दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर अनुक्रमे आयडिया (3.59 Mbps), एअरटेल (3.37 Mbps), एअरसेल (2.36 Mbps) आहेत.