मुंबई: मारुती सुझुकी ऑल्टोनं बाजारात आपला दबदबा कायम ठेवला आहे. 2017च्या पहिल्या पाच महिन्यात मारुतीनं ऑल्टो हॅचबॅकच्या तब्बल 1.07 लाख कारची विक्री केली आहे. अद्यापही या कारची मागणी मोठ्या प्रमाणात आहे.
कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, मागील तीन वर्षात या कारच्या मागणीत 4 टक्क्यांची वाढ आहे. सामन्यांच्या आवाक्यातील किंमत, कमी मेंटेनन्स खर्च आणि मारुतीचं सर्वात मोठं सर्व्हिस नेटवर्क यामुळे ग्राहक अल्टोला पसंती देत असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे.
ऑल्टो हॅचबॅकमध्ये 0.8 लीटर आणि 1.0 लीटर पेट्रोल इंजिनचाही ऑप्शन मिळतो. यामध्ये सीएनजीही उपलब्ध आहे.
दरम्यान, रेनॉल्टची क्विड आणि डॅटसनच्या रेडी-गोमुळे अल्टोला बरीच स्पर्धा निर्माण झाली आहे. पण या दोन्ही कारना मात देत अल्टोनं अद्याप तरी आपला दबदबा कायम ठेवला आहे.
स्टोरी सौजन्य: cardekho.com