Airtel jio Recharge Plan :  सर्व मोबाईल नेटवर्क कंपन्यांनी आपल्या प्रीपेड प्लान्सच्या किमती वाढवल्या आहेत. त्यामुळे जर तुम्हीही इंटरनेटसोबत अनलिमिटेड कॉलिंगचा नवा प्लान घेण्याचा विचार करत असाल, तर आज आम्ही तुम्हाला काही  बजेट फ्रेंडली प्रीपेड रिचार्ज प्लान्सबाबत सांगणार आहोत. एअरटेल (Airtel) आणि जियो (jio) कंपनीचे हे प्लान 100 रूपयांपेक्षा कमी किंमतीचे आहेत. णून घेऊयात, या प्लान्समध्ये डाटा आणि अनलिमिटेड कॉलिंग व्यतिरिक्त काय सुविधा मिळणार याबाबत...



Jio Recharge Plan:  जियो कंपनीने त्यांच्या 73 रूपयांच्या प्लानमध्ये  अनलिमिटेड कॉलिंग  2.5GB डेटा आणि   50SMS या सुविधा दिल्या आहेत. या प्लानची वैधता 23 दिवस आहे. तसेच जिओ कंपनीच्या 91 रूपयांच्या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, दररोज 100MB डेटा आणि 50SMS या सुविधा देण्यात आल्या आहेत. तसेच या प्लानमध्ये  200MB एक्स्ट्रा डेटा देण्यात आला आहे. याची वैधता 28 दिवस आहे.  हे दोन्ही प्लान बजेट फ्रेंडली आहेत. 
 
Jio चा दररोज 1.5GB चा सर्वात स्वस्त प्लान 119 रुपयांचा आहे. याची वैधता 14 दिवसांसाठी असणार आहे. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि 300SMS ची सुविधा देण्यात येते.  
 
Airtel Recharge Plan: एअरटेलचा अनलिमिटेड कॉलिंग सुविधा असणारा सर्वात स्वस्त प्लान 19 रूपयांचा आहे. या 19 रूपयांच्या प्लानमध्ये  200MB डेटा मिळतो.  


Airtel चा दररोज 1.5GB चा सर्वात स्वस्त प्लान 299 रुपयांचा आहे. याची वैधता 28 दिवसांची आहे. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 SMS ची सुविधा देण्यात येते. याव्यतिरिक्त अॅमेझॉन प्राईम व्हिडीओचं मोबाईल अॅडिशनचा 30 दिवसांचं सब्स्क्रिप्शन दिलं जातं. 


संबंधित बातम्या :


Bulletproof iPhone : बंदुकीच्या गोळीचाही सामना करणार Bulletproof iPhone 13, जाणून घ्या किंमत


Airtel Jio Vi : दररोज 1.5GB डेटा अन् अनलिमिटेड कॉलिंगचे 'हे' प्लान, कोणता योग्य?


Reliance Jio : भारतातील सर्वात स्वस्त प्रीपेड रिचार्ज प्लॅन 24 तासाच्या आत जीओने घेतला मागे