Airtel, Jio, Vi Best Prepaid Plans : सर्व मोबाईल नेटवर्क कंपन्यांनी आपल्या प्रीपेड प्लान्सच्या किमती वाढवल्या आहेत. त्यामुळे जर तुम्हीही इंटरनेटसोबत अनलिमिटेड कॉलिंगचा नवा प्लान घेण्याचा विचार करत असाल, तर आज आम्ही तुम्हाला काही प्रीपेड रिचार्ज प्लान्सबाबत सांगणार आहोत. एअरटेल, जियो, व्हीआय (Airtel, Jio, Vi) मध्ये दररोज 1.5GB डाटा रिचार्जचे प्लान्स उपलब्ध आहेत. जाणून घेऊयात, या प्लान्समध्ये डाटा आणि अनलिमिटेड कॉलिंग व्यतिरिक्त काय सुविधा मिळणार याबाबत...
Jio Prepaid Plan (जियो प्रीपेड प्लान)
- Jio चा दररोज 1.5GB चा सर्वात स्वस्त प्लान 119 रुपयांचा आहे. याची वैधता 14 दिवसांसाठी असणार आहे. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि 300SMS ची सुविधा देण्यात येते.
- 199 रुपयांच्या प्लानमध्ये दररोज 100SMS, अनलिमिटेड कॉलिंगसोबत 1.5GB डेटा देण्यात येत आहे. याची वैधता 23 दिवसांची आहे.
- जियोचा 239 रुपयांच्या प्लानमध्ये 28 दिवसांच्या वैधतेसोबत दररोज 100SMS, अनलिमिटेड कॉलिंगसह 1.5GB डेटा देण्यात येतो.
- 479 रुपयांच्या प्लानमध्ये दररोज 100SMS, अनलिमिटेड कॉलिंगसह 1.5GB डेटा देण्यात येत आहे. याची वैधता 56 दिवसांची आहे.
- जियोचा 84 दिवसांचा प्लान 666 रुपयांमध्ये मिळतो. यामध्ये दररोज 100SMS, अनलिमिटेड कॉलिंगसोबत 1.5GB डेटा देण्यात येतो.
- जियोचा 1.5 GB डेटा 336 दिवसांच्या वैधतेसह 2545 रुपयांना मिळतो. यामध्ये दररोज 100SMS, अनलिमिटेड कॉलिंगसह 1.5GB डेटा देण्यात येतो.
Airtel Prepaid Plan (एअरटेल प्रीपेड प्लान)
- Airtel चा दररोज 1.5GB चा सर्वात स्वस्त प्लान 299 रुपयांचा आहे. याची वैधता 28 दिवसांची आहे. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 SMS ची सुविधा देण्यात येते. याव्यतिरिक्त अॅमेझॉन प्राईम व्हिडीओचं मोबाईल अॅडिशनचा 30 दिवसांचं सब्स्क्रिप्शन दिलं जातं.
- 479 रुपयांच्या प्लानमध्ये दररोज 100SMS, अनलिमिटेड कॉलिंगसह 1.5GB डेटा देण्यात येत आहे. याची वैधता 56 दिवसांची आहे. यामध्ये अॅमेझॉन प्राईम व्हिडीओचं मोबाईल अॅडिशनचा 30 दिवसांचा सब्स्क्रिप्शन फ्री देण्यात येत आहे.
- एअरटेलचा 666 रुपयांच्या प्लानमध्ये 77 दिवसांच्या वैधतेसह दररोज 100SMS, अनलिमिटेड कॉलिंगसोबत 1.5GB डेटा देण्यात येतो.
- 719 रुपयांच्या एअरटेलच्या रिचार्ज प्लानमध्ये दररोज 100SMS, अनलिमिटेड कॉलिंगसह 1.5GB डेटा दररोज देण्यात आला आहे. याची वैधता 84 दिवसांसाठी आहे.
Vi Prepaid Plan (व्हीआय प्रिपेड प्लान)
- Vi चा दररोज 1.5GB चा सर्वात स्वस्त प्लान 299 रुपयांचा आहे. याची वैधता 28 दिवसांची आहे. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 SMS ची सुविधा देण्यात येते.
- 479 रुपयांच्या प्लानमध्ये दररोज 100SMS, अनलिमिटेड कॉलिंगसह 1.5GB डेटा देण्यात येत आहे. याची वैधता 56 दिवसांची आहे.
- 666 रुपयांच्या प्लानमध्ये दररोज 100SMS, अनलिमिटेड कॉलिंगसह 1.5GB डेटा देण्यात येतो. याची वैधता 77 दिवसांची आहे.
- व्हीआयचा 719 रुपयांच्या प्लानमध्ये 84 दिवसांच्या वैधतेसह दररोज 100SMS, अनलिमिटेड कॉलिंगसोबत 1.5GB डेटा देण्यात आला आहे.
- 180 दिवसांच्या व्हीआयचा प्लॅन 1449 रुपयांचा आहे. यामध्ये दररोज 100SMS, अनलिमिटेड कॉलिंगसह 1.5GB डेटा देण्यात येतो.
- व्हीआयचा 365 दिवसांच्या वैधतेचा प्लान 2899 रुपयांचा आहे. यामध्ये दररोज 100SMS, अनलिमिटेड कॉलिंगसह 1.5GB डेटा देण्यात येतो.
महत्त्वाच्या इतर बातम्या :