जीएसएलव्ही मार्क-3 संध्याकाळी 5 वाजून 28 मिनिटांनी यशस्वीरित्या अंतराळात झेपावलं. याआधी 2 हजार 300 किलोहून अधिक वजनाचे उपग्रह अंतराळात सोडण्यासाठी इस्त्रोला इतर देशांवर अवलंबून राहावं लागत होतं.
https://twitter.com/isro/status/871733569672097792
जीएसएलव्ही मार्क-3 च्या यशस्वी प्रक्षेपणामुळे भारताला चार टनाहून जास्त वजनाच्या उपग्रहांचं प्रक्षेपण करणं शक्य होणार आहे. यामुळे भारतासमोर अंतराळ संशोधनाच्या अनेक संधी निर्माण झाल्या आहेत
जीएसएलव्ही मार्क-3 चे वैशिष्ट्य :
- तीन टनाहून अधिक वजन
- अहमदाबादेत निर्मिती
- भारतात बनवलेलं आणि प्रक्षेपण करण्यात आलेलं सर्वात वजनदार उपग्रह
- स्वदेशी लीथियम आयन बॅटरींद्वारे चालणार
- इंटरनेट स्पीड आणि कनेक्टिव्हिटीमध्ये वाढ होण्यास मदत होईल