मुंबई: मोबाइल बाजारात सध्या आयफोन 7 आणि आयफोन 7 प्लसची बरीच चर्चा आहे. पण आता अॅपल लवकरच आपला नवा स्मार्टफोन आयफोन 8 आणण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.

सध्या आयफोन 8विषयी अनेक नवनवीन गोष्ट समोर येत आहेत. आयफोन 8चे काही कथित फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तसेच याचे काही फीचर्सही लीक झाल्याची चर्चा आहे.



इंटरेनटवरील फोटोनुसार आयफोन 8 चा असा लूक असणार आहे. पण एबीपी माझानं या फोटोंची पडताळणी केलेली नाही.


आयफोन 8चे कथित फोटो पाहिल्यानंतर असं दिसून येत आहे. आयफोन आपल्या अॅल्युमिनियम बॉडीचा कन्सेप्ट न वापरता त्यात ग्लास आणि स्टेनलेस स्टील बॉडीचा वापर करु शकतं.

आयफोन 8 मध्ये अनेक नवे फीचर असू शकतात. सोशल मीडियावरील माहितीनुसार पुढीलप्रमाणे असू शकतात याचे फीचर्स:

आयफोन 8 मध्ये ड्यूल-लेन्स 3D कॅमेरा असू शकतो.

प्लास्टिक OLED स्क्रिनसोबत कर्व्ह्ड ग्लास केसिंग असू शकतं.

आयफोन 8 वायरलेस चार्जिंग सपोर्ट असणार

5 इंच आणि 5.8 इंच स्क्रिन असण्याची शक्यता

होम बटन नसण्याची शक्यता, स्क्रिनवरच फिंगर प्रिंट सेंसर देण्यात येऊ शकतं.