नवी दिल्ली : चारचाकी आणि दुचारी वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे. थर्ड पार्टी इन्शुरन्सच्या प्रीमियममध्ये 50 टक्क्यांऐवजी 16 ते 28 टक्क्यांदरम्यान वाढ होणार असल्याची माहिती भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने दिली. नवे दर एप्रिलपासून लागू होणार आहेत.

भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाच्या (IRDA) नव्या आदेशानुसार, थर्ड पार्टी इन्शुरन्स केवळ 16 ते 18 टक्क्यांनीच वाढेल. त्यामुळे 28 मार्च रोजी 50 टक्के वाढीचा काढला आदेश आता लागू होणार नाही. आधीच्या आदेशात भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने फेरबदल केले आहेत.

कोणतेही वाहन रस्त्यावर उतरण्याआधी थर्ड पार्टी इन्शुरन्स कव्हर घेणं अनिवार्य असतं. त्यानंतरच एखाद्या दुर्घटनेवेळी संबंधित व्यक्तीला विमा कंपनीकडून नुकसान भरपाई दिली जाते.