मुंबई: सॅमसंगचा मोस्ट अवेटड स्मार्टफोन गॅलक्सी S8 आणि गॅलक्सी S8+ भारतात 19 एप्रिलला लाँच होणार आहे. सॅमसंग इंडियानं ट्वीट करुन याबाबत माहिती दिली आहे. 'भारतात 19 एप्रिल 2017ला सॅमसंग गॅलक्सी S8 आणि S8+ अनबॉक्ससाठी तयार राहा. #UnboxYourPhone'
सॅमसंगनं भारतात आपल्या गॅलक्सी S8 डिव्हाईसचं प्री बुकींग सुरु केलं आहे. त्यामुळे आता ग्राहक या स्मार्टफोनसाठी नोंदणी करु शकतात.
सॅमसंग गॅलक्सी S8 आणि S8 प्लसमध्ये 6.2 इंच डिस्प्ले असून त्याचं रेझ्युलेशन 1440x2960 पिक्सल आहे. या स्मार्टफोनला कर्व्ह्ड एज देण्यात आलं आहे. सॅमसंगनं आपलं ट्रेडिशनल फिजिकल होम बटण हटवून यात आता इनव्हिजिबल होम बटण दिलं आहे. तसंच रिअर पॅनलवर कॅमेऱ्याचा खाली फिंगरप्रिंट सेन्सरही दिलं आहे.
या दोन्ही स्मार्टफोनमध्ये 12 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आहे. इतक्याच मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा गॅलक्सी S7 स्मार्टफोनमध्येही देण्यात आला होता. दोन्ही स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे.
या स्मार्टफोनमध्ये 3.5 ऑडिओजॅक देण्यात आलं आहे. या दोन्ही डिव्हाईसमध्ये Snapdragon 835 किंवा सॅमसंगचं Exynos प्रोसेसर देण्यात येणार आहे. यामध्ये 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज देण्यात आलं असून एसडी कार्डनं मेमरी वाढवता येऊ शकते.
S8 मध्ये 3000 mAh बॅटरी देण्यात आली आहे. तर S8 प्लसमध्ये 3500 mAh बॅटरी आहे.