iQOO Z5 Smartphone : Vivo चा सब-ब्रांड iQOO चा नवा स्मार्टफोन iQOO Z5 चीनमध्ये लॉन्च करण्यात आलं आहे. कंपनीनं हा स्मार्टफोन 21,600 रुपयांच्या किमतीपासून बाजारात लॉन्च केला आहे. ही 8GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेज असणाऱ्या व्हेरियंटची किंमत आहे. अशातच आता हा फोन लवकरच भारतात लॉन्च होणार आहे. हा फोन भारतात 27 सप्टेंबर रोजी दाखल होणार आहे. यामध्ये 44 वॉटची फास्ट चार्जिंग वाली 5000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आलेली आहे. त्यासोबतच यामध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. जाणून घेऊया स्मार्टफोनचे फिचर्स... 


स्पेसिफिकेशन्स 


iQOO Z5 स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचाचा 120Hz रिफ्रेश रेट असणारा डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचं रिझॉल्यूशन (1080x2400 पिक्सल) आहे. फोन अॅड्रॉइड 11 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. यामध्ये स्नॅपड्रॅगन 778G प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज देण्यात आलं आहे. 


कॅमेरा 


iQOO Z5 स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्याचा प्रायमरी कॅमेरा 64 मेगापिक्सल आहे. तसेच 8 मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड अँगल कॅमेरा देण्यात आला आहे. त्यासोबतच 2 मेगापिक्सला मॅक्रो लेंस आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यामध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. 


बॅटरी आणि कनेक्टिव्हिटी 


पावरसाठी iQOO Z5 स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. जी 44W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. कनेक्टिविटीसाठी फोनमध्ये व्हायफाय, ब्लूटूथ, जीपीएस आणि यूएसबी पोर्ट यांसारखे फिचर्स देण्यात आले आहेत. 


या फोनशी होणार स्पर्धा 


iQOO Z5 स्मार्टफोनची स्पर्धा OnePlus, Samsung, Xiaomi आणि Oppo यांसारख्या ब्रँड्ससोबत होणार आहे. फेस्टिव्ह सीझनमध्ये या कंपन्या अनेक नवीन फोन बाजारात घेऊन येणार आहेत. हा फोन याच महिन्यात भारतात लॉन्च केला जाऊ शकतो. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :