मुंबई : अॅपलने मार्च महिन्यात बहुचर्चित ‘आयफोन SE’ लॉन्च केला. या आयफोनची अनेक दिवसांपासून मोबाईलप्रेमी वाट पाहत होते. मात्र, भारतातील या आयफोनच्या किंमतीने अनेकांची निराशा झाली. मात्र, अॅपल कंपनीने आयफोनप्रेमींना खुशखबर दिली आहे. अॅपलने पहिल्यांदाच ‘आयफोन SE’च्या किंमतीत मोठी कपात केली आहे.
भारतीय बाजारपेठेत ‘आयफोन SE’ची किंमत 39 हजार रुपये होती. मात्र, आता अॅपलने किंमतीत कपात करत ऑफर जाहीर केली आहे. पेटीएम या ऑनलाईन रिटेलरवरुन ‘आयफोन SE’चं 16 जीबी रोझ-गोल्ड व्हेरिएंट खरेदी केल्यास 3 हजार रुपयांचं कॅशबॅक आणि काही सवलतही मिळणार आहे.
मात्र या ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना A3K कूपन कोडचा वापर करावा लागणार आहे. कॅशबॅकची रक्कम पेटीएम वॉलेटमध्ये मिळेल, अशी माहिती अॅपलकडून देण्यात आली आहे.
आयफोन SE चा लूक आयफोन 5s सारखा असून, स्क्रीन, जाडी, साईड ब्लेजही आयफोन 5s सारखेच आहेत. जबरदस्त कॅमेरा हे आयफोन SE ची खासियत आहे. यामध्ये A9 प्रोसेसर आणि M9 मोशन प्रोसेसर देण्यात आला आहे. 12 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आणि 4K व्हिडीओ रेकॉर्डिंग फीचर देण्यात आले आहेत.