Iphone 15 :  अॅपल कंपनीचे (Apple) फोन अर्थात आयफोन (iPhone) यांची गेली अनेक दशकं हवा आहे. या कंपनीचे फोन वापरणं म्हणजे अनेकांचं स्वप्न असतं, ही कंपनी आपल्या फोन्समध्ये देत असलेले आधुनिक फिचर्स यामागील कारण आहे. या फोन्सना बाजारात प्रचंड मागणी असून सध्या सर्वात लेटेस्ट म्हणजे आयफोन 13 बाजारात असून आतापासून भविष्यातील फोन्सची देखील चर्चा होत आहे. यामध्ये आयफोन 15 बद्दल एक माहिती समोर येत असून या मॉडेलमध्ये सीमकार्ड टाकण्याची सुविधा नसणार आहे. त्याजागी ई सिम हा पर्याय कंपनी देणार आहे. फोनमध्ये दोन्ही ई सिम असल्याने फिजीकल सीम कार्डचं या फोनमध्ये काहीच काम नसणार असं म्हटलं जात आहे. 


एका परदेशी वेबसाईटने दिलेल्‍या माहितीनुसार, 2023 पर्यंत आयफोन 15 बाजारात येऊ शकतो. ज्यामध्ये दोन्ही ई सीम (Dual E Sim) असण्याची शक्यता आहे. त्यामुळे सिमकार्ड खराब होणे अशी समस्या वापरकर्त्यांना येणार नाही. दरम्यान सध्या बाजारातील लेटेस्ट आयफोन्समध्ये ई सिम ही सुविधा असून एक फिजीकल सीम टाकून सोबत ई सिमही वापरता येऊ शकते. 


ई सिम म्हणजे काय?


ई सिम म्हणजे एक अशा प्रकारचं सॉफ्टवेअर आहे ज्याच्या मदतीने फोनमध्ये सिमकार्ड न टाकता हवं असेल त्या कंपनीचं मोबाईल नेटवर्क वापरता येईल. यासाठी संबधित कंपनीच्या स्टोर गॅलरीतून फोनमध्ये तशी सेटींग करुन घ्यावी लागते. असे केल्यानंतर इतर सर्व सुविधा या सामान्य सिमकार्डप्रमाणे आणि त्याच रेटने तुम्ही वापरु शकता.


संबंधित बातम्या :



मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live