iphone 14 Latest Feture about Car Crash : टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचं अहमदाबाद-मुंबई महामार्गावर झालेल्या अपघातत दुर्दैवी निधन झालं. तेव्हापासूनच रस्ते सुरक्षा आणि कारच्या सुरक्षेबाबतचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी मोठी घोषणा करत कारमधून प्रवास करणाऱ्या सर्वच प्रवाशांना सीट बेल्ट अनिर्वाय असल्याचं सांगितलं. आता जगप्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी Apple नं देखील आपलं नवं फिचर लॉन्च केलं आहे. 


जगप्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी Apple नं क्रॅश डिटेक्शन (Crash Detection) फीचरसह नवीन iPhone 14 सीरीज लॉन्च केली आहे. या फिचरमुळे कार अपघात होताच आपत्कालीन अलर्ट पाठवला जाईल. यामुळे अनेकांचे जीव वाचू शकतात. क्रॅश डिटेक्शन फीचरमधून अलर्ट मिळाल्यानंतर, यंत्रणाही त्वरित घटनास्थळी पोहोचू शकतात आणि आवश्यक मदत देऊ शकते.


हे फीचर आयफोन 14 (iPhone 14) सीरीजच्या iPhone 14, iPhone 14 Plus, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max च्या चारही मॉडेल्समध्ये देण्यात आलं आहे, असे फिचर याआधी कोणत्याही फोनमध्ये देण्यात आलेलं नाही. यामुळे गाडीचा अपघात झाल्यास संबंधित एजन्सीला तत्काळ सूचना देण्यात येणार आहेत. 


Apple नं हे फिचर लॉन्च केलं असलं तरी, सध्या मात्र हे फिचर भारतात उपलब्ध होणार नाही. अॅपलनं हे फिचर नुकतंच अमेरिका आणि इतर काही देशांमध्ये लॉन्च केलं आहे. भारतात हे फिचर लॉन्च होण्यासाठी आणखी काही कालावधी लागणार आहे. हे फिचर कंपनीनं नव्या Apple Watch सोबतही दिलं आहे. 


Crash Detection फिचर आहे तरी काय? 


एखाद्या व्यक्तीचा कार अपघात झाला तर Apple चं हे Crash Detection फिचर ते शोधून काढू शकतं. त्यानंतर आपातकालीन सेवांचे क्रमांक आपोआप डायल होतील आणि अपघात झाल्याची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल. त्यामुळे युजर जखमी झाला असला तरी अपघात झाल्याची माहिती यंत्रणांपर्यंत पोहोचेल. आपत्कालीन सेवांना अपघाताची माहिती पोहोचवण्या व्यतिरिक्त Apple Watch यूजर्सच्या डिव्हाइसचं लोकेशनही निकटवर्तीय आणि यंत्रणांपर्यंत पोहोचवणार आहे. 


कंपनीनं सांगितलं की, अॅडव्हान्स अॅपल डिझाइन मोशन अल्गोरिदमला रियल वर्ल्ड ड्रायव्हिंगसोबत ट्रेन करण्यात आलं आहे. त्यामुळे हे फिचर क्रॅश रिकॉर्ड डाटा अधिक अचूकपणे प्रोवाइड करेल. क्रॅश डिटेक्शन (Crash Detection) फिचरला वर्सेटाईल करण्यासाठी कंपनीनं प्रोफेशनल क्रॅश टेस्ट लॅबमधून मोशन सेंसर्सच्या डेटाचा वापर करुन अल्गोरिदम तयार केलं आहे. या फिचरच्या मदतीनं डिव्हाइस मागच्या जनरेशनच्या डिव्हाइसपेक्षा अधिक सक्षम बनतो. 


iPhone 14 अखेर लॉन्च


दिग्गज टेक कंपनी Apple नं आपला बहुप्रतीक्षित iPhone 14 अखेर भारतात लॉन्च केला आहे. ग्राहक गेल्या अनेक महिन्यांपासून या फोनच्या लॉन्चिगची वाट पाहत होते. अखेर हा फोन लॉन्च करण्यात आला आहे. अॅपलचा इव्हेंट कंपनीचे सीईओ टिम कुक यांनी हा फोन लॉन्च केला आहे.


Apple चे म्हणणे आहे की, आयफोन 14 आणि आयफोन 14 प्लस आयफोनमध्ये सर्वोत्तम बॅटरी लाइफ देण्यात आली आहे. हे दोन्ही फोन A15 बायोनिक चिपवर चालतात. अॅपलने आयफोनमधील चिपचा पुनर्वापर करण्याची ही पहिलीच वेळ आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Apple iPhone 14 Launch: प्रतीक्षा संपली! iPhone 14 अखेर लॉन्च; जगातील सर्वात फास्ट फोन, कंपनीचा दावा