नवी दिल्ली : सध्या कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरु आहे. अनलॉक-1 सुरु झालं असलं तरिही काही कंपन्यांनी मात्र अजुनही वर्क फ्रॉम होम सुरु ठेवलं आहे. अशातच जर तुम्ही प्रत्येक महिन्याला रिचार्ज करून कंटाळला असाल तर आज आम्ही तुम्हाला वर्षभरासाठी असलेले खास प्री-पेड प्लान्सबाबत माहिती सांगणार आहोत. तसेच यामधील सर्वात खास गोष्ट म्हणजे, या वर्षभराच्या प्लान्समध्ये तुम्हाला 1.5 GB डाटा मिळणार आहे. तसेच युजर्सना जास्त फायदा देण्यासाठी कंपन्या काही इतर सुविधाही देत आहेत. जाणून घेऊया...


Airtel


Airtelसाठी 1.5 GB डाटा प्लानची किंमत 2398 रुपये आहे. हा एक लॉन्ग टर्म प्लान असून याची व्हॅलिडिटी 365 दिवसांसाठी असणार आहे. यामध्ये दररोज 100 एसएमएसची सुविधा युजर्सना मिळणार आहेत. या प्लानसोबत युजर्सना ZEE5 Premium आणि Wynk Music चं फ्री सब्स्क्रिप्शन मिळणार आहे. जे लोक व्हिडीओ पाहणं पसंत करतात त्यांच्या Airtel हा उत्तम पर्याय असल्याचं बोललं जातं.


Reliance Jio


Jio नेदेखील दररोज 1.5GB असलेल्या डाटा प्लान युजर्ससाठी आणला आहे. या प्लानची किंमत 2121 रुपये आहे. परंतु, या प्लानमध्ये 336 दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. याव्यतिरिक्त यामध्ये दररोज 100 एसएमएसही फ्री मिळतात. एवढचं नाहीतर Jio टू Jio नेटवर्कवर फ्री अनलिमिटेड कॉलिंग आणि 12 हजार एफयूपी मिनिट्स मिळतात. ज्याच्या मदतीने नॉन Jio नेटवर्कवर कॉलिंग करणं शक्य होतं. या प्लानमध्ये Jio च्या सर्वच अॅप्सचं सब्स्क्रिप्शन फ्री मिळतं.


Vodafone


Vodafoneच्या दररोज 1.5GB डाटा प्लानची किंमत 2399 रुपये आहे. हा एक लॉन्गटर्म प्लान आहे. ज्याची व्हॅलिडिटी 365 दिवसांसाठी आहे. यामध्ये दररोज 100 एसएमएस फ्री मिळतात. यामध्ये युजर्सना अनलिमिडेट कॉलिंगची सुविधा देण्यात येते. या प्लानसोबत कंपनी Vodafone play आणि ZEE5 Premium चं सब्स्क्रिप्शन मिळतं. या तीन प्लान्समध्ये सर्वाधिक फिचर्स असणारा Airtelचा प्लान आहे. त्यामुळे अनेकांसाठी हा वर्षभरासाठी बेस्ट ऑप्शन ठरु शकतो.


संबंधित बातम्या :


प्ले स्टोअरवरून हटवलं Remove China Apps; गूगलकडून कारण मात्र अस्पष्ट


दररोज 3GB डाटा आणि 28 दिवसांची व्हॅलिडिटी असणारे बेस्ट प्रीपेड प्लान्स