मुंबई : जसं की आपल्याला माहित आहे, भारताने 59 चिनी अॅपवर सुरक्षेच्या कारणास्तव बंदी घातली. यानंतर लगेचच फेसबुक आणि इन्स्टाग्रामसारख्या सोशलसाईट्स सुद्धा भन्नाट फिचर्स घेऊन आपल्या समोर घेऊन आल्या. फेसबुकच्या Avatar फीचरबद्दल आपण माहिती घेतली होतीच पण त्यानंतर आता प्रत्येकाच्या वॉलवर नवं फिचर दिसू लागलंय ते म्हणजे फेसबुक Rooms आणि इन्स्टाग्राम टिक टॉकच्या धर्तीवर जवळपास साधर्म्य असलेलं Reels हे फीचर घेऊन आलं आहे. जाणून घेऊया या दोन्ही फीचर्सबद्दल...
हल्ली लॉकडाऊन काळात वेगळ्या क्षेत्रातील उद्योग जगतात, ऑनलाईन शाळा, कॉलेज, क्लासेस, कॉन्फरन्ससाठी व्हिडीओ मीटिंग केल्या जात आहे. यासाठी गुगल मीट, झूमसारखी अॅप्स आजवर नेटिझन्स वापरत होती आणि याच पार्श्वभूमीवर जिओने देखील व्हिडीओ कॉन्फरन्स अॅप सुरु करुन यात उडी घेतली, तर मग फेसबुक यात कसं मागे राहिल?
फोटो सौजन्य : iGoogle
फेसबुक सुद्धा घेऊन आलंय Rooms फीचर. हे वापरुन युजर रुम्स क्रिएट करु शकतो. आपल्या फ्रेंड लिस्टमधील मंडळींसोबत मेसेंजर रुममध्ये तब्बल 50 व्यक्तींना घेऊन अनलिमिटेड व्हिडीओ कॉलिंग करता येते!
हे फीचर मुख्यत्वे zoom अॅपला मुख्यत्वे टक्कर देताना दिसून येत आहे तर दुसरीकडे टिक टॉक बंद झाल्यावर चिंगारीसारख्या अॅपकडे टिकटॉकर्स वळले होते. पण आता टिकटॉक सारखे व्हिडीओ करता येणार आहेत इन्स्टाग्रामवर. होय, इन्स्टाग्रामच्या स्टोरीमध्ये हे नवं फीचर आलंय!
यासाठी युजर्सना अॅपमध्ये हे अपडेट करावं लागेल आणि इन्स्टाग्रामच्यास्टोरी मध्ये एक नवं फीचर आलेलं दिसेल, ते म्हणजे Reels! या Reels मध्ये अगदी टिकटॉकसारखे छोटे व्हिडीओ, गाणी तसेच व्हिडीओची गती अर्थात स्लो मोशन, फास्ट फॉरवर्ड, टायमर ते फिल्टर्स आणि व्हिडीओसोबत जोडता येण्यासाठी म्युजिकही युजर्सच्या आवडीनुसार लावता येणार आहे.
टिकटॉकचे चाहते क्रिएटर वर्ग अॅपवर बंदी घातण्याने नाराज झाले पण इन्स्टाग्रामने आणलेल्या या Reels मध्ये ते सगळं करता येणार आहे जे पूर्वी टिकटॉक वर करता यायचं. यामुळे युजर्स, क्रिएटर्स यांच्यामध्ये या नव्या फिचर बद्दल उत्सुकता दिसून येत आहे!