Xiaomi-Realme : भारतीय स्मार्टफोन बाजारात Realme आणि Xiaomi यांच्यात अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. हा वाद केवळ बाजारापुरता मर्यादित नसून सोशल मीडिया साइट्सवरही दिसून येत आहे. Xiaomi हा भारतातील मार्केट लीडर असताना, Realme ने गेल्या एका वर्षात सर्वात वेगाने लोकप्रियता मिळवली आहे. तसेच मोठ्या बाजारपेठेत स्थान निर्माण केले आहे. दोन्ही ब्रँड मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरवर एकमेकांना लक्ष्य करत आहेत, एका लॉन्च इव्हेंटमध्ये घडलेला किस्सा चांगलाच व्हायरल होतोय. ज्यामुळे सध्या ट्विटर वॉर सुरू आहे. 


 






एका इव्हेंटनंतर कॉपी कॅट युद्ध


Realme आणि Redmi तसे सारखेच वाटतात, आणि त्यामुळेच दोन प्रतिस्पर्धी स्मार्टफोन निर्मात्यांमध्ये 'कॉपी कॅट' युद्ध ट्विटरच्या माध्यमातून पुन्हा चर्चेत आले. Redmi Buds 3 Lite च्या लॉन्च इव्हेंट दरम्यान Xiaomi इंडियाचे महाव्यवस्थापक सुमित सोनल यांनी चुकून Redmi ला Realme म्हणून संबोधले आणि म्हणाले, "Realme/Redmi buds श्रेणीमध्ये आमची पहिली आवृत्ती सादर करत आहोत आणि ती म्हणजे Redmi Buds. .." जे ट्विटर हँडलद्वारे पोस्ट करण्यात आले. यावर युझर्सकडूनही वारंवार टेक मीम्स पोस्ट करण्यात आले. यानंतर सोनल यांच्या प्रेझेंटेशनची पोस्ट Realme India CEO माधव सेठ ही पोस्ट @Trolling_isart या नावाने ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आली, ज्यात त्यांना Xiaomi ची खिल्ली उडवली आणि लिहीले "फक्त चाहतेच नाही... तर इतर ब्रँड्सनाही realme आवडते." सेठ यांच्या ट्विटने दोन प्रतिस्पर्धी ब्रँड्समधील ट्विटर युद्धाला मार्ग मिळाला. यावर Xiaomi च्या सोनलनेही प्रत्युत्तर दिले, "काय आवडत नाही, अशा  कॉपी-कॅट स्ट्रॅटेजीसाठी तुमच्या टीमला सलाम आहे"


 






--------------------------------------