DIZO Watch D Sharp Launch: DIZO ने आपली DIZO Watch D Sharp भारतात लॉन्च केली आहे. डिझो वॉच डी शार्प डिझाइनसह लॉन्च करण्यात आली आहे. DIZO Watch D Sharp मध्ये प्रीमियम डिझाइनसह मोठा 1.75-इंचाचा डिस्प्ले आहे. या घड्याळाची बॅटरी 14 दिवस चालेल, असा दावा कंपनीने केला आहे. DIZO Watch D Sharp ला Water Resistant 5ATM रेट केले आहे. आपण DIZO Watch D Sharp चे फीचर्स आणि किंमतीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.


DIZO वॉच डी शार्पचे स्पेसिफिकेशन 



  • DIZO च्या या घड्याळात 1.75-इंचाचा मोठा डिस्प्ले आहे. जो 320x390 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 550 nits ब्राइटनेस सपोर्टसह येतो.

  • DIZO Watch D Sharp मध्ये 110 हून अधिक स्पोर्ट्स मोड आणि 150 हून अधिक वॉच फेस देण्यात आले आहेत.

  • DIZO Watch D Sharp ला Water Resistant  5ATM रेट केले आहे.

  • कंपनीने दावा केला आहे की, DIZO Watch D Sharp ला त्याच्या सेगमेंटमध्ये 86 टक्के अधिक शार्प आणि ब्राइट डिस्प्ले देण्यात आला आहे.

  • डिझेओ वॉच डी शार्प तीन रंग पर्यायांमध्ये येते- क्लासिक ब्लॅक, सिल्व्हर ग्रे आणि डीप ब्लू.

  • DIZO Watch D Sharp मध्ये ब्लड ऑक्सिजनचे मॉनिटर करण्यासाठी SpO2 सेन्सर आणि 24x7 रिअल-टाइम हार्ट रेट मॉनिटर आहे.

  • डिझो वॉच डी शार्पमध्ये स्लीप ट्रॅकिंग, वॉटर इनटेक, स्टेप्स, कॅलरीज आणि डिस्टन्स ट्रॅकिंग यासारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

  • DIZO Watch D Sharp मध्ये कॅमेरा कंट्रोल, म्युझिक कंट्रोल, अलार्म, फोन फाइंड, कॉल-मेसेज नोटिफिकेशन, वेदर फोरकास्ट, पॉवर सेव्हिंग मोड इत्यादी फीचर्स देखील आहेत.

  • DIZO Watch D Sharp मध्ये 300mAh बॅटरी आहे. जी 14 दिवसांचा बॅटरी बॅकअप देते.

  • कनेक्टिव्हिटीसाठी DIZO Watch D Sharp मध्ये ब्लूटूथ v5.1 व्हर्जन आहे.

  • डिझो वॉच डी शार्प हे अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्हींसोबत जोडले जाऊ शकते.


किंमत 


लॉन्च ऑफर अंतर्गत DIZO Watch D Sharp 2,999 मध्ये उपलब्ध होणार आहे. DIZO Watch D Sharp ची विक्री 29 जुलै रोजी दुपारी 12 वाजता सुरू होईल.