Instagram Outage : मेटा (Meta)-मालकीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामला आउटेजचा (Instagram Outage) सामना करावा लागत आहे. इन्स्टाग्राम वापरण्यास अडथळा येत असल्याने इन्स्टाग्राम यूजर्स संतप्त झाले आहेत. अनेक यूजर्सने तर ट्वीटर पोस्ट टाकून संताप व्यक्त केला आहे. यामध्ये काही यूजर्सनी इन्स्टाग्राम फीड रिफ्रेश होत नसल्याचा रिपोर्ट दिला आहे. तर अनेकांना अॅपवर लॉग इनच करता येत नसल्याचं मत व्यक्त केलं आहे.     


या संदर्भात DownDetector ने असे सांगितले आहे की, आज सकाळी 09:30 वाजल्यापासून अनेक यूजर्सना इन्स्टाग्रामवर लॉग इन करण्यास अडथळे येत आहेत. यामध्ये अनेकांना फोटो, व्हिडीओ, रिल्स अपलोड करण्यास अडथळा येतोय. तर अनेकांना लॉग इन च्या सामना करावा लागतोय. तसेच ही समस्या देशभरातील मुंबई, दिल्ली, जयपूर, लखनौ, बेंगळुरू आणि इतर अनेक शहरांतील यूजर्सना भेडसावत आहे. असे दिसून आले आहे. 


मात्र, असे असले तरी सर्वच यूजर्सना ही समस्या भेडसावत नसल्याचेही समोर आले आहे. काही यूजर्स अजूनही इन्स्टाग्रामवर लॉग इन करू शकतात. तसेच, त्यांचे फीड रिफ्रेश करू शकतात. 


यूजर्सना भेडसावणाऱ्या समस्या 



  • देशातील निवडक वापरकर्त्यांसाठी Instagram बंद आहे.

  • फीड पोस्ट करण्यासाठी तसेच रिफ्रेश करताना अडथळा निर्माण होतोय. 

  • मेटा यांनी या प्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.


महत्वाच्या बातम्या :