Instagram : सोशल मीडियावरील फोटो शेअरिंग प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामने ( Instagram ) त्याच्या ब्रँड लोगोसह अनेक नवे बदल केले आहेत. इन्स्टाग्रामधील हे नवे बदल फंक्शन्सशी संबंधित नसून त्यांचा लोगो, टाइपफेस, रंग आणि डिझाइन सारख्या घटकांमध्ये आहेत. व्हिज्युअल रिफ्रेशसह मोबाइल अॅप आणि वेब ब्राउझरपासून मिळणाऱ्या अनुभवात सुधारणा करण्यात आली आहे.
इंस्टाग्राममध्ये दिसणार नवा ग्रेडियंट
इंस्टाग्राम अॅपच्या आयकॉनिक पोलरॉइड इंद्रधनुष्याला एक नवीन रिफ्रेश प्राप्त झाला आहे. पूर्वी उपलब्ध असलेले स्थिर इंद्रधनुष्य आता अनेक रंगांच्या अॅरेमध्ये बदलले आहे. हे ग्रेडियंट 2D आणि 3D मध्ये रचना व रंग संतुलनाशी संबंधित असतील. हा ग्रेडियंट 'स्टोरी रिंग्ज' मध्ये वापरला जाईल आणि रंग पॅलेटचा आधार देखील बनवेल.
मेटा कंपनीने तयार केला ग्लोबल कस्टम टाइपफेस
इन्स्टाग्रामकडून एक नवीन ग्लोबल कस्टम टाइपफेस इन्स्टाग्राम सैन्स या नावाने तयार करण्यात आला आहे. हे Instagram glyph द्वारे प्रेरित आहे, जे कॅमेऱ्याच्या मिनिमलिस्ट (दूरवरील दृश्य) आकारासारखे दिसते. कंपनीच्या वेबसाइटनुसार, "परफेक्ट सर्कल आणि स्क्वेअर ज्याला प्रेमाने 'Squircle' म्हणतात त्यामधील डिझाइन टाइपफेसद्वारे प्रदर्शित केले जाईल." नवीन टाईपफेस तीन प्रकारांमध्ये येईल, जो जागतिक स्क्रिप्ट आणि एक्सेसिबिलिटी लक्षात घेऊन डिझाइन केलेले आहे.
फॉन्ट
इन्स्टाग्रामने त्यांच्या सध्याच्या फॉन्टमध्ये आणखी सुधारणा केली आहे. तीन नवीन प्रकारांमध्ये इन्स्टाग्राम सैन्स आणि ब्लॉक सारखा इन्स्टाग्राम सैन्स फॉन्टचा समावेश आहे. हे फॉन्ट हलके, नियमित, मध्यम आणि ठळक अशा वेगवेगळ्या वजनात बनवले जातात. कंपनीने या फॉन्टला सहज हताळता येण्यासासाठी त्यात बलद करण्यात आले आहेत. उदाहरणार्थ फॉन्टमधील 'a' अक्षराला टियरड्रॉपआकार असून तो हाताने लिहिले आहे.
मांडणी
लेआउट आणि ब्रँड रिसोर्सेजमधील डिझाइन बदलांसह मोबाइल अॅप सारखा अनुभव सर्व प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असेल असे इन्स्टाग्रामने म्हटले आहे. कंपनीने आपले मार्केटिंग कम्युनिकेशन 'सोपे आणि आणखी मजबूत' बनवण्यासाठी हे बदल केले आहेत. याबरोबरच कंटेंटवर लक्ष केंद्रित करायचे आहे. नवीन डिझाइनसह चांगल्या अनुभवासाठी पूर्ण-ब्लीड फोटो दाखवला जाईल.
जगभरात एक अब्जाहून अधिक लोक इंस्टाग्राम अॅप वापरतात आणि वापरकर्ते दररोज सरासरी 53 मिनिटे इन्स्टाग्रामवर आपला वेळ घालवतात. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केलेल्या प्रत्येक पोस्टमध्ये सरासरी 10 पेक्षा जास्त हॅशटॅग वापरले जातात. इन्स्टाग्राम अॅपचे बहुतेक वापरकर्ते 35 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत, म्हणजेच याला तरुणांचे सोशल मीडिया अॅप म्हणता येईल.