वर्धा :  वर्ध्यातील पुलगाव येथील इंडियन मिलिटरी स्कूलमधील विद्यार्थ्यांनी रेल्वेचं अनोखं मॉडेल तयार केलं आहे. ज्यामध्ये रेल्वे विभागासाठी काही नाविन्यपूर्ण संकल्पना मांडल्या आहेत. या मॉडेलचं राज्यभर कौतुक केलं जात आहे.


 

केरळ येथे एर्नाकुलमध्ये झालेल्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात मॉडेल सादर करण्यात आलं. या प्रतिकृतीला सध्या दिल्ली येथे कौन्सिल ऑफ सायन्स अॅन्ड इंडस्ट्रीयाल रिसर्च (CSIR) होणाऱ्या स्पर्धेत सहभागी करण्यात आले आहे.

 

रेल्वे गेट ओलांडताना होणारे अपघात थांबणार

 

इंडियन मिलिटरी स्कूलमधील नववीच्या वर्गात शिकणाऱ्या मुल्लांनी ही संकल्पना मांडली आणि शिक्षकांच्या मदतीने त्याचं मॉडेल तयार केलं. या प्रोजेक्टमध्ये रेल्वेट्रॅक ओलांडताना होणारे अपघात असो किंवा रेल्वे ट्रॅकवर स्वच्छतेचा अभाव असो, यावर चांगला पर्याय सुचवला आहे.

 

वीज निर्मितीचीही संकल्पना

 

रेल्वे गेट चुकीच्या पद्धतीने ओलांडताना दर वर्षी हजारो जणांना आपला जीव गमवावा लागतो. यावर चांगला पर्याय सुचवत ऑटोमॅटीक रेल्वेक्रॉसिंग गेट, जे गेटपासून काही अंतरावर येताच सतर्कतेचा इशारा देत बंद होतील. एकदा बंद झाल्यास कोणीही ते ओलांडून शकणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे. तसेच यामध्ये मोठ्या रेल्वे जंक्शनवर मोठ्या प्रमाणात रेल्वेची आवागमन सुरु असतात. अशा ठिकाणी ट्रॅकवर विद्युत जनरेटर लावल्यास वीजनिर्मिती केल्या जाऊ शकेल अशी संकल्पना मांडण्यात आली आहे.

 

यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियान देशभर राबवलं जात आहे. यात रेल्वे ट्रॅकवर मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य आढळून येतं. ते स्वच्छ ठेवण्यासाठी सक्शन पंपचा वापर केलास स्वच्छ ठेवण्यास मदत होईल. शिवाय कचऱ्याला रिसायकल करत पुन्हा वापरात आणलं जाऊ शकेल. रेल्वेतील टॉयलेटमुळे प्लॅटफॉर्मवरील ट्रॅकवरील घाण राहणार नाही यावर विचार केला गेला आहे.

 

विद्यार्थ्यांनी आलेला अनुभव या मॉडेलच्या माध्यमातून सत्यात उतरविण्याचा प्रयत्न केला आहे. त्याची निवड हे सुरुवातीला जिल्हास्तरावर झाली. विविध चाळणीतून चालत त्याची भरारी राज्यस्तरावर झाल्यानं सर्वत्र कौतुक केलं जात आहे.